अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळतं आहे. सैराटसारख्या सिनेमामधून अवघ्या महाराष्ट्राची अगदी कमी कालावधीतचं लाडकी झालेली रिंकू राजगुरू आज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याची अनेकदा पहायला मिळते.

तिच्या अनेक फोटोंना आणि व्हिडिओजना नेहमीच चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत राहतो, यावेळी तर तिच्या नव्या व्हिडिओने अगदी कहरच केलेला पहायला मिळतो आहे. मखना या गाण्यावर नवा व्हिडिओ शुट करून शेअर करत असताना रिंकूने कॅप्शनमधे असं लिहलयं की, जिथे असाल तिथेच एन्जॉय करा.

रिंकू सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शुटवर हजर आहे. आणि तिने याच शुटच्या वेळी फावला वेळ मिळाल्यानंतर हा व्हिडीओ शुट केल्याचं समजतं आहे. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात ती शुट करत असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय महत्वाचं म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरदेखील या प्रोजेक्टमधे भुमिका साकारणार आहेत.

तूर्तास तरी या प्रोजेक्टसंदर्भात बरीच माहिती गुपित ठेवण्यात आली असली तरी शुटींगच्या काही फोटोंवरून हा प्रोजेक्ट एक कोर्ट कचेरीचा ड्रामा असण्याची चिन्हे पहायला मिळतं आहेत. सैराट सिनेमा हिट गेल्यानंतर रिंकूकडे आजवर कामांची वर्णी लागतच राहिलेली पहायला मिळाली आहे. तिचे सैराटनंतर काही चांगले प्रोजेक्सही बाहेर पडले आहेत. आणि यापुढेही तिच्या हातात चांगल्या कामांची वर्णी लागली असल्याची पहायला मिळते आहे.

सध्या रिंकू राजगुरू पुन्हा एकदा तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे. रिंकूला सहसा आर्ची नावाने जास्त संबोधल्या जातं, त्याच कारणही तितकं विशेष आहे. हे आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सैराट या नागराज मंजुळे यांच्या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक दैदीप्यमान असा साजेसा तुरा रोवला. या सिनेमातलं पात्र आर्ची अर्थात रिंकू राजगुरू.

तिने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक जबरदस्त भन्नाट स्टायलिश लुकमधला व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या लुकवर आणि डान्सच्या अदांवर चाहत्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद येत आहे. रिंकूच्या या नव्या अदाकारीवर सर्व चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव होताना पहायला मिळतो आहे.

रिंकू दिवसेंदिवस आपल्या अभिनयाला अधिक खुलवत सिनेसृष्टीत काम करताना पहायला मिळत आहे. तिने मागे “मेकअप” हा मराठी सिनेमा केला होता. यात तिने साकारलेली भुमिका तिच्या आधीच्या दोन सिनेमांपेक्षा पूर्णत: वेगळी होती. रिंकूने कागर या सिनेमातही जबरदस्त भुमिका केली होती.

हा सिनेमा राजकारण या विषयावर आधारित होता, या सिनेमाला महाराष्ट्रातील जनतेने भरगच्च प्रतिसाद दिला असल्याच पहायला मिळालं. आता नागराज मंजुळे आपल्या नव्या झुंड या हिंदी प्रोजेक्टसोबत “अमिताभ बच्चन” यांना मुख्य भुमिकेत ठेवत जो सिनेमा घेऊन येत आहेत, त्यातही रिंकू राजगुरू असणार आहे. रिंकूच्या वाट्याला नव्याने येणाऱ्या प्रोजेक्टबाबत तिचे चाहते नेहमीच उत्सुक असल्याचे पहायला मिळतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!