Manja Bole “मांजा बोले” प्लॅनेट मराठीचा नवा चॅट शो
मराठी सिनेमा आज अगदी साता समुद्रपार पोहोचला आहे. मराठी सिनेमा आजपर्यंतच्या काळात अनेक विभागात प्रगती केलीआहे, मग ती तांत्रिक असो किंवा कथेच्या बाबतीत असो. डिजिटल मीडियावरही मराठी सिनेमला व्यासपीठ मिळावं यासाठी प्लॅनेटमराठी नवी संकल्पना सुरु झाली आहे. या संकल्पेनेला ट्वीटर इंडियाने पाठिंबा दिला आहे. प्लॅनेट मराठीने डिजिटल मीडियाच्यामाध्यमातून मराठी सिनेमा तसेच सिनेमाशी निगडित कलाकार, तंत्रज्ञ लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी
Manja Bole ‘मांजा बोले’ हा कार्यक्रम घेऊनयेत आहे. मुंबईतील ट्वीटर आँफिसमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ह्या आगळ्यावेगळ्या धमाल चॅट शोची घोषणा करण्यातआली. महेश मांजेरकर या शोचं सूत्रसंचालन करणार असून पहिल्यांदाच ते सूत्रधाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
सतत काहीतरी हटके करण्याची महेश मांजरेकर यांची खासियत आपल्या सर्वाना माहिती आहे. या शोच्या माध्यमातून असाच एकहटका प्रयत्न महेश मांजरेकर थेट सोशल मिडियावर करणार आहेत. सोशल मीडियावरून मराठी सिनेमा, कलाकार, लेखक आणित्यांच्या कलाकृतींविषयी भरभरून बोलू शकतील हा या शो मागचा मूळ उद्देश आहे. महेश वामन मांजरेकर आपल्या खास शैलीतूनशोमध्ये येणाऱ्या कलाकारांना बोलत करणार आहेत.
‘मांजा बोले’ या कार्यक्रमाची एक झलक यावेळी दाखवण्यात आली. Hrudayantar“हृदयांतर” यासिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस तसेच अभिनेत्री सोनाली खरे यांच्याशी महेश मांजरेकर यांनी गप्पामारल्या. महेश मांजरेकर यांच्या तिरकस प्रश्नांना या दोघांनी तितकीच खुमासदार उत्तर दिली.
ट्वीटर इंडियाचे हेड विरल जानी यांनीया कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्लॅनेट मराठी भविष्यात अजून अनेक नवीन उपक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवरराबवण्यात येतील असा विश्वास प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी यावेळी सांगितले. प्लॅनेट मराठीचा “मांजा बोले” हाधमाल चॅट शो फॉलोअर्सना काही दिवसातच पाहायला मिळेल.