Mandira Bedi

वयाच्या 48 वर्षी कुणी आई होणार हे ऐकल्यावर आपण जरा आश्र्चर्य चकित व्हाल; पण सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या 48 वर्षी आई होणार आहे. ती कोण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचा नवरा राज कौशल यांच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे. मंदिरा आणि राज यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

याबाबत माहिती देताना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्रीने मुलीचे नाव सोशल मीडियावर सांगितले.

मंदिरा बेदीला यापूर्वीच एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. पण तिला एक मुलगी हवी होती. यामुळे मंदिराने एक गोंडस चिमुरडी दत्तक घेतली .मंदिराने सांगितले की तिने आपल्या मुलीचे नाव तारा बेदी कौशल ठेवले. जी तिने दत्तल घेतलेली आहे.

मंदिरा बेदी ने कुटुंबासोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले. एका कवितेच्या माध्यमातून तिने सांगितले की चार महिन्यांपूर्वीच तारा दत्तक हे नाव ठेवलेली मुलगी घेतली आहे.

तिने लिहिले की, ‘ती आमच्याकडे दैवी आशीर्वादांसारखी आली. आमची छोटी मुलगी तारा. 4 वर्षे आणि कमी वय आणि डोळ्यासह तारे यामुळे ती परी पेक्षाही काही कमी नाही.

मंदिरा बेदी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आपल्याला वेगवेगळ्या चित्रपट आणि सिरीज मध्ये दिसत असते. मंदिरा बेदी सध्या मुलगी दत्तक घेतलेलं सोशल मीडियावर कळल्या नंतर फार चर्चेत आहे. सगळीकडून तिला शुभेच्छा येत आहेत.