अभिनेता प्रभास आणि दिग्दर्शक राजामौली या जोडीचा अगदी सुपरहिट ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. बाहुबली आज या सिनेमाबद्दल बोलायचं म्हटलं तर एक शब्द नक्कीच मनात येतो, तो म्हणजे काय अप्रतिम आणि भन्नाट सिनेमा बनवला आहे. निश्चितच या सिनेमाने भारताच्या सिनेसृष्टीला एक वेगळीच दिशा दिली असं म्हणावं लागेल. बाहुबली सिनेमाने अनेक रेकॉर्ड बनवले. या सिनेमाची तितकीच जोरावर सर्वांमधे चर्चादेखील झाली. अनेकजण तर हा सिनेमा कसा इतका भव्यदिव्य बनवला गेला यावरच चकीत होऊन राहिले होते.
अनेकांना या सिनेमाच्या तयार होण्यापाठीमागच्या गोष्टी जाणून घेण्यात रस निर्माण झाला होता. चला तर मग आपण जाणून घेऊयात या सिनेमात नेमके सिन्स कशा पद्धतीने आणि किती चोखरित्या शुट करण्यात आले होते. बाहुबली या सिनेमात केवळ प्रभासचं नाही तर अभिनेत्री तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्याही अगदी उत्कृष्ट भुमिका पहायला मिळाल्या होत्या. बाहुबली या सिनेमाचा नायक प्रभास जितका बलशाली होता तितक्याच ताकदीचा नकारात्मक भुमिकेचाही अभिनेता पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शकाला यश आलं होतं. बाहुबलीच्या काही दृश्यांमधे अनेकदा व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाचं पहायला मिळालं होतं. एका दृश्यात तर रथाच्या समोर थेट डोंगर दाखवण्यात आला होता, जिथे की केवळ एक सपाट जमिन दिसत होती.
पुढे एका प्रसंगात देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी एका मोठ्या हवाई जहाजात असलेली पहायला मिळते. मुळात हा सिन केवळ हिरव्या रंगाच्या पडद्याच्या मदतीने साकारण्यात आला आहे, ज्याने या सिनला हवा तसा शेप देण्यास व्हिएफएक्सची मदत झाली. मुळात बाहुबली हा सिनेमा व्हिएफएक्सच्या मदतीशिवाय इतका अफाट बनवनं फारच कठीण गेलं असतं ही गोष्ट अगदीच मान्य करावी लागेल. पण दिग्दर्शकाच्या कार्यकुशलतेला फार मानही द्यावा लागेल, ज्या प्रमाणात साऱ्या गोष्टींचा ताळमेळ अगदी न चुकता त्यांनी बसवला ते कार्य अफाटच.
आता पुढे आपण आणखी काही दृश्यांची माहिती घेणार आहोत, या दृश्यांपैकी एका दृश्यात लढाईच्या दरम्यान अभिनेता प्रभास इतर सैनिकांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जमिनीवर आडवा पडून पुढे सरकत जातो, परंतु सत्यात हा सिन एका हिरव्या रंगाच्या कपडयांवर तो आडवा झोपून पुढे सरकताना दिसतो, आजूबाजूला सैनिक नाही तर केवळ हिरवा पडदाच लावलेला दिसतो. आता पुढच्या एका दृश्याबद्दल बोलायचं म्हटलं तर हे दृश्य तेव्हाच आहे जेव्हा राजमातेसमोर एक विशालकाय हत्ती येत असतो आणि त्याच्या पाठीमागे एक भव्य मंदिर पहायला मिळतं. सत्यात तिथे केवळ एक निळा कपड्याची भिंत आहे आणि हत्तीच्या जागेवर तीन काठ्या उभ्या केलेल्या पहायला मिळतात. आणि व्हिएफएक्सच्या कृपेने इथे अगदीच वेगळ्या प्रकारचा सिन उभा राहिलेला आपल्याला पहायला मिळतो.
खरतरं ही सारी कमाल जरी तंत्रज्ञानाच्या वापराची असली तरी यात दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात येतचं. बाहुबली या सिनेमाला अशाच अनेक इतर दृश्यांनी अवाढव्य स्वरूपात लोकांसमोर मांडण्यात मदत केली. आणि लोकांना पडद्यावर ते सारकाही पाहताना अगदी भन्नाट वाटून गेलं. मुळात बाहुबली या सिनेमाच्या दोन भागानंतर आता पुन्हा नेटफ्लिसने बाहुबली याच विषयावर एक वेबसिरीज बनवायचा निर्णय घेतल्याच पहायला मिळतं आहे. या वेबसिरीजचं कामही सुरू झाल्याची चर्चा पहायला मिळते आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!