ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

सैराटच्या यशानंतर महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या मनात घर करून बसलेली रिकु राजगुरू तुम्हाला आठवते का? कित्येक रसिक आजही सैराट मधील रिंकुच्या अभिनयाचं कौतुक करतात. या चित्रपापासून रिंकुला एक वेगळीच ओळख मिळाली. अर्चीची ती भूमिका आजही प्रत्येकाच्या मनात आहे. त्यानंतर तिने एक चित्रपट देखील केला. आता रिंकू मेकअप या तिच्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. आपल्या अभिनयाने आपली ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री किती मानधन घेत असेल? असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडत असेल. आज या लेखामध्ये तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर नक्कीच सापडेल….

सिनेसृष्टीत अभिनेत्रींना अभिनेत्या पेक्षा कमी मानधन दिल्याचे सांगितले जाते. परंतु रिंकुने तिचा आगामी चित्रपट मेकअप साठी तब्बल २७ लाखाचे मानधन घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत कारण मराठीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ही रक्कम खूपच जास्त असल्याचे बोलले जात आहे. रींकुच्या लोकप्रियतेमुळे तिला येवढे मानधन दिल्याचे सांगितले जाते.

रिंकुचा मेक अप हा चित्रपट लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात रिंकू अभिनेता चिन्मय उदगीरकर याच्या सोबत काम करताना दिसेल असे सांगितले जात आहे. ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर सोबत दिसणार असल्याने प्रत्येकाला या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. रिंकु या चित्रपटामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका करताना दिसणार आहे.७ फेब्रवारीला हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटासोबतच रिंकू सध्या ताहीर शब्बीरसोबत 100 ही वेब सिरीज करत आहे. या वेब सिरीज मध्ये ती प्रमुख भुमिका करणार असल्याचे सांगितले जाते. तहीरणे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याची स्टोरी शेर केलेली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोंवरून बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. या वेब सिरीज मध्ये अभिनेत्री लारा दत्ता देखील दिसणार आहे. या वेब सिरीज च्या माध्यमातून रिंकू प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्म वर दिसणार आहे. ही वेब सिरीज hotstar वर प्रसिद्ध होणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.