गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.

या मालिकेने एक विलक्षण वळण घेतलं आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिल्या प्रमाणे माया गुरूच्या सांगण्यावरून राधिकाला ब्लॅकमेल करतेय. पण शनायामुळे राधिकाला गुरूचा सगळा प्लॅन कळतो. शनाया राधिका एकमेकेंची माफी मागतात आणि एकत्र येऊन गुरूला धडा शिकवायचं ठरवतात. त्यानुसार दोघीपण आता गुरूच्या प्रेत्येक छोट्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. मायाला आपल्या बाजूने करून गुरूला चांगलाच धडा शिकवायचा असा राधिकाचा प्लॅन आहे. गुडीपाडव्याच्या दिवसापासून राधिका आणि शनाया गुरूला हरवण्याचा दिशेने एक एक पाऊल उचलणार आहेत. या दोघी गुरूला कशी अद्दल घडवणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा गुडी पाडवा विशेष भाग फक्त झी मराठीवर.