आपल्याकडे अनेक छोट्या पडद्यावरील मालिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. त्यातील अनेक पात्र देखील रसिकांसाठी खूपच महत्त्वाची असतात. प्रेक्षक त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला खऱ्या नावाने ओळखत नाहीत तर त्या मालिकेतील पात्राच्या नावानेच जास्त ओळखतात. अशीच एक छोट्या पडद्यावरील मालिका सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे, त्या मालिकेचे नाव “माझ्या नवऱ्याची बायको” असे आहे.या मालिकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग आहे.

या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांच्या मनामध्ये घर करण्यात यशस्वी ठरलेली आहे. या मालिकेमध्ये राधिकाला प्रत्येक अडचणींमध्ये मदत करणारी, तिला चांगला सल्ला देणारी तिची मैत्रीण म्हणजेच रेवतीच म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहंदळे पात्र देखील प्रचंड गाजत आहे.

गुरुनाथ बरोबरच्या लढाईमध्ये राधिकाला रेवतीची खंबीर साथ लाभत असते. कोण आहे ही अभिनेत्री जीने या मालिकेमध्ये रेवतीची भूमिका केली आहे, याबद्दल तुम्ही सर्व नक्कीच उत्सुक असाल त्या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता मेहंदळे.

श्वेता मेहेंदळे ही अभिनेता राहुल मेहेंदळे यांची पत्नी आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये दोघांनीही एकत्र काम केलेलं आहे. ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. असं म्हटलं जातं की या मालिकेत काम करत असतानाच या दोन कलाकारांमध्ये प्रेमाचं नातं तयार झालं.

त्यानंतर या दोघांनीही विवाह केला. या दोघांना आर्य नावाचा एक मुलगा देखील आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये श्वेताने गंभीर व पुरुषांचा तिरस्कार करणाऱ्या महिलेची भूमिका साकारलेली आहे असे असले तरी ती खासगी आयुष्यामध्ये मात्र धमाल मस्ती करत असते.

श्वेताने याआधी देखील अनेक छोट्या भूमिका साकारलेले आहेत या सोबतच तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे.