Loading...

मराठी चित्रपटांची सध्या देशातच नाही, तर जगभरात चर्चा आहे. मात्र मराठी चित्रपट स्थित्यंतराच्या काळातून जात असताना महेश मांजरेकर यांच्या दे धक्का या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थानं धक्का दिला होता. कारण या चित्रपटानं २००८ मध्ये दहा कोटींचा व्यवसाय केला होता. आता पुन्हा एकदा ११ वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीला धक्का मिळणार आहे. कारण महेश मांजरेकर नव्या वर्षात दे धक्का २ हा चित्रपट घेऊन येत असून, ३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Loading...

Loading...

दे धक्का २ चं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि स्कायलिंक एंटरटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाचे यतीन जाधव आणि स्वाती खोपकर निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बट्टीन आणि तबरेट पटेल को प्रोड्यूसर, कर्मिका टंडन आणि विशिष्ठा दुसेजा असोसिएट प्रोड्यूसर आहेत. महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दे धक्का २ चं दिग्दर्शन करणार आहेत.

दे धक्का मधील मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही दे धक्का २ मध्ये दिसेल. मात्र बाकी कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर वेलकम टू लंडन असं म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटाचं महत्त्वाचं कनेक्शन लंडनशी असणार हे कळतं आहे. आता ते काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. मात्र, चित्रपटाचं पोस्टर अत्यंत फ्रेश आणि रंजक आहे. त्यामुळे चित्रपटही नक्कीच धमाकेदर असेल यात शंका नाही.

Loading...