बॉलीवुड हे क्षेत्रच असे आहे की, येथे कायमच अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या गरमागरम चर्चा कायमच रंगत असतात. यांत एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर्सची म्हणजेच विवाहबाह्य संबंधांच्या चर्चा अत्यंत चवीने चघळल्या जातात.

अशी आजवर अनेक उदाहरणे घडलेली आहेत. त्यातलाच हा एक असाच किस्सा, जो घडला होता एकेकाळची सुपरहिट ऑन स्क्रीन जोडी अनिल  कपूर आणि आणि माधुरी दिक्षित यांच्या बाबतीत. ज्यामुळे जोडी सुपरहिट असूनही त्यांनी तब्बल १७ वर्षे एकत्र एकही चित्रपट केला नाही. नेमके असे काय घडले ? जाणून घेऊ या…

तर झाले असे की, एकत्र काम करता करता अनिल आणि माधुरीची जवळीक वाढली. त्यांच्या चर्चा व्हायला लागल्या. मीडियामध्येही मग दररोज बातम्या यायला सुरुवात झाली. फक्त शूटिंग करवेळीच नाही तर ही दोघे बाहेरही एकत्र वेळ घालवत असल्यामुळे यांच्यात व्यावसायिक नात्यापालिकडेही काही वेगळे असल्याची माहिती समोर आली होती.

अनिल कपूर विवाहित असल्याने माधुरी सोबतच्या या बातम्या त्याची पत्नी सुनीता कपूर यांच्याही कानावर गेली. मग काय? एक दिवस सुनीता नेमकी खरी परिस्थिती काय आहे हे स्वतःच जाणून घेण्यासाठी मुलांना घेऊन सिनेमाच्या शूटिंग सेटवर पोहोचली.

बायको आणि मुलं सेटवर आल्यावर साहजिकच अनिल त्याच्या कुटुंबासोबत राहिला. ते सर्वजण आनंदाने एकत्र वेळ घालवत असल्याचे माधुरी दिक्षितने पाहिले. त्याची ही सुखी आणि आनंदी फॅमिली पाहून मग आपली अनिलसह असलेली वाढती जवळीक योग्य नसल्याचे माधुरीच्या लक्षात आले.

आपल्यामुळे मुळे या सुखी परिवाराच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण होऊ शकते. एका चांगल्या संसाराचे वाटोळे होऊ शकते म्हणून खुद्द माधुरीनेच अनिलमध्ये जास्त गुंतण्या आधीच त्याच्या आणि परिवाराच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

नंतर अनिल कपूर सोबत सिनेमातही एकत्र काम करायचे नाही असा निर्णय तिने घेतला होता. म्हणूनच फिल्मच्या ऑफर्स स्विकारण्यापूर्वी त्या फिल्मचा हिरो कोण याची चौकशी केल्यानंतरच माधुरी त्या फिल्मच्या ऑफर्स स्विकारायची.

सन २००० मध्ये दोघांनी दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात शेवटचा स्क्रीन शेअर केला होता. नंतर माधुरी दीक्षित ने १९९९ मध्ये अमेरिकेतील सर्जन डॉ श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर माधुरीही बॉलिवूडपासून दूर जात अमेरिकेतच स्थायिक झाली होती.

दहा वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर माधुरी पुन्हा भारतात परत आली. मग २००७ मध्ये ‘आजा नचले’ या सिनेमातून तिने दमदार पुनरागमन केले होते. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले होते.

त्यानंतर थेट  १७ वर्षांनंतर त्या दोघांनी ‘टोटल धमाल’ या फिल्म मध्ये एकत्र काम केले आणि आजही या जोडीचा करिश्मा पाहिल्यासारखाच असल्याचा अनुभव प्रेक्षकांसह त्यांनाही आला असणार यात शंकाच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.