सर्वशक्तीशाली बलवान हनुमानाची महती या जगात सर्वस्त्र आहेच, शिवाय हनुमान म्हणजे एका अर्थी भक्तीचं निस्वार्थ भाव ठेवणारं प्रतिक. देवांचे देव अर्थात महादेव यांचा हनुमान हा 11 वा अवतार संबोधला जातो. या संपूर्णत: चालू कलयुगात “हनुमान” एकमेव देव मानले जातात जे त्यांच्या भक्तांच्या समस्येचं निवारण करतात किंबहुना भक्तांच्या हाकेला धावून येतात.

असं मानल्या जातं अनेक लोकं वर्षानुवर्षे एखाद्या ठराविक इच्छा, आकांक्षा वा जर अडचणी असतील तर त्या साऱ्या हनुमानाच्या चरणी डोकं ठेवून त्यांच्याकडे मदत मागतात आणि हनुमानही आपल्या भक्तांना कधी निराश करत नाहीत, हनुमान भक्तांना योग्य मार्ग दाखवतात.

मुळात संंकट मोचक असणाऱ्या अशा या महान देवाबद्दल म्हणजेचं हनुमानाबद्दल एक अशी माहिती आज तुम्हाला द्यायची आहे ज्यात त्यांच्या अशा तीर्थस्थळाचा उल्लेख आहे जिथे चमत्कार घडलेले पहायला मिळतात.

अर्थात रामायणातल्या महत्वपूर्ण घडामोडींनंतर लंका दहण झाल्यावर हनुमानाला ज्या ठिकाणी तपातून मुक्ती मिळाली होती, तेच हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मध्य प्रदेशातील नायगाव जवळ स्थित चित्रकूट येथे “हनुमान धारा” या नावे हे स्थळ आज सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात भगवान हमुमानाला स्पर्श करत दोन जलकुंड नेहमी वाहत असतात.

या जलधारा सतत वाहत्या राहतात, यावरूच या ठिकाणाला “हनुमान धारा” हे नाव पडलं. भगवान हनुमानाच्या लंकेदहनासमयी शेपटीला लागलेली आग विझवण्यासाठी जो बाण रामाने मारला तो या पाण्याच्या ठिकाणी. जेणेकरून पाण्याने हनुमानाच्या शेपटीला होणारी वेदना कमी होईल.

या जलकुंडाबद्दल स्थानिकांमधे रोचकता भरपूर आहे; काही वर्षांपूर्वी इथे पंचमुखी हनुमानाने दर्शन दिल्याचेही दाखले दिले जातात. परंतु मनात खरा भाव ठेवून जे भक्त या ठिकाणाला भेट देतात त्यांचे निश्चितचं या तीर्थस्थळाला येणे सार्थक होते. कारण मनोभावे सेवा करणाऱ्यांचे हनुमान नेहमी ऐकतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.