lek-majhi-ladki-sunil-barve-songLek Majhi Ladki – Sunil Barve Song

लेक माझी लाडकीमध्ये सुनील बर्वे वेगळ्या अंदाजात 

संपूर्ण महारष्ट्राला नात्यांच्या एका वेगळ्या प्रवाहात घेऊन जाणाऱ्या Star Pravah स्टार प्रवाह वरील Lek Majhi Ladki ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत महत्वाचे वळण आले आहे. आई आणि मुलीच्या नाजूक नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेतील इरावतीचा भूतकाळ या भागातून उलगडला जाणार आहे. लग्नाआधीचे तिचे  पहिले प्रेम असलेला आदित्य सावंत पुन्हा तिच्या आयुष्यात आला आहे. मालिकेत नव्याने आलेल्या या विशेष पात्राची भूमिका मराठीचा चिरतरुण अभिनेत्रा SUNIL BARVE सुनील बर्वे साकारात आहे.

इरावतीचे जुने प्रेम बनून आलेला हा आदित्य म्हणजेच सुनील बर्वे या मालिकेद्वारे पुन्हा एकदा गायक म्हणून लोकांसमोर येणार आहेत. करिअरच्या सुरवातीला रेडियो जॉकी म्हणून काम केल्यानंतर सुनील बर्वे यांनी अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमावले.  त्यानंतर पुन्हा एकदा सारेगमप मधून सुनील बर्वे यांनी स्वतःला सिध्द देखील केले होते. सुनील यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज देखील दिला आहे, त्यांचा या गोड आवाजांचा पुन्हा एकदा आस्वाद घेण्याची नामी संधी ‘लेक माझी लाडकी’ या मालीकेच्या शनिवार दि. २४ डिसेंबरच्या भागात रसिकांना मिळणार आहे,

sunil-barve-lek-majhi-ladki

 

जयदेवचा मित्र बनून सुभेदारांच्या घरात आलेला हा आदित्य इरावतीच्या आयुष्यात कोणते वादळ आणतोहे पाहणे रंजक ठरणार आहे.जयदेव आणि इरावतीच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी आलेल्या आदित्यला जयदेव गाणे गाण्याचा आग्रह करतोअसा हा सीन आहे. आदित्यच्या गाण्यामुळे इरावातीला तिचे पहिले प्रेम आठवते कातिची होणारी अस्वस्थता मीराला समजते काहे सारे काही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here