कोरोनाचे रोजच्या रोज बदलणारे आकडे, चढते आलेख, कधी कधी मनाला चटका लावणाऱ्या घटना तर कधी परिस्थिती नियंत्रणात येतानाच्या दिलासादायक बातम्या …. मानवी मनाला आता अशा चढ उतारांशी रोज सामना करावा लागतोय. आज काहीही न करता स्ट्रेस लेव्हल म्हणजेच मनावरील ताणतणाव वाढताना दिसतोय. आणि या करीताच ओंनलाईन योगा क्लासेस, ओंनलाईन मोटिव्हेशन लेक्चर्स इ. डिजिटल जनजागृती वाढताना दिसतेय.

करमणूक हा मोटिव्हेशनचाच एक भाग असून आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि यानंतरही राहणार आहे. मनावरील ताण कमी करण्यासाठी चित्रपटच्या माध्यमातून होणारी करमणूक नेहमीच उपयुक्त ठरली  आहे.

लॉकडाऊनचा परिणाम अर्थात आपल्या चित्रपटसृष्टीला देखील बसला आहे, वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यातून थांबवण्यात आले, चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रोमोशन रखडले आहेत. आणि याच वेळेचा सदुपयोग करत एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय  रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट “लॉ ऑफ लव्ह” घेऊन येत आहेत. सध्या डिजिटली जास्तीत जास्त लोकं “ऍक्टिव्ह” असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत “लॉ ऑफ लव्ह” च्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण सोशल मीडियावर केलं  आणि या पोस्टर ला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे.

चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितक्याच हटके त्याची कहाणी असेल यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांचा हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊन नंतर सुरु होणाऱ्या प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे. या सिनेमात नक्की कोणकोणते कलाकार असणार आहेत, कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यातचं आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकचं राहील.

“प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती पूर्णपणे जाणता खास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नवं काहीतरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे. लॉकडाऊन च्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना लार्जर द्यान लाईफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे”

  जे. उदय, निर्माता आणि पटकथाकार