ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

Lalit Prabhakar And Neha Mahajans ‘TTMM’ Tujha Tu Majha Mi Upcoming Marathi Movie

तुझं तू माझं मी चित्रपटाचा टिझर पोस्टर रिलीज

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यामध्ये चाललेल्या कोल्ड वॉरचंकोडं त्यांच्या सर्व चाहत्यांना पडलेलं पण त्याचा शेवट त्यांच्या आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी)च्या टिझर पोस्टर रिलीजने झाला. ललित आणि नेहा यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे हि त्यांच्याचाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एंटरटेनमेंट व वैशालीएंटरटेनमेंट प्रस्तुत TTMM चित्रपटामधील नेहा आणि ललितची धमाल जोडी सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजनकरण्यासाठी सज्ज आहे. मीरा एंटरटेनमेंट आणि वैशाली एंटरटेनमेंट यांनी याआधी ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली होती. TTMM चा टिझर पोस्टर चाहत्यांचीसिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढवेल यात शंकाच नाही. डॉ. संतोष सवाणे निर्मित TTMM हा चित्रपट१६ जून २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.