बहुतांश लोकांना काळ्या रंगापेक्षा पांढऱ्या रंगाचे आकर्षण असते. पण हाच पांढरा रंग कधी कधी श्राप असल्यासारखा जीवनात येतो. अंगावर येणारा हा छोटा पांढरा डाग इतरांपासुन वेगळा करतो. त्यामुळे अशा लोकांना सामाजिक कुचंबणेला सामोरं जावं लागतं. ह्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि न्यूनगंड निर्माण होतो.

बऱ्याचदा अशा पांढऱ्या डागांचा संबंध कुष्ठरोगाशी केला जातो. पण प्रत्येक पांढरा डाग हा कुष्ठरोग नसतो आणि संसर्गजन्य ही नसतो. ह्याला कोड म्हणतात. कोड हा कोणालाही वयाच्या कुठल्याही वर्षी होऊ शकतो. कोड म्हणजे नक्की काय?

शरीरामध्ये मेलॅनोसाईट्स नावाच्या पेशी असतात. ह्या पेशी मेलॅनीन नावाचे रसायन तयार करतात त्यामुळे आपल्या शरीराचा रंग ठरतो. जर हे रसायन जास्त झाले तर काळा रंग निर्माण होतो आणि कमी झाले तर पांढरा (गोरा).ह्या मेलॅनोसाईट्सचा मृत्यू कोडसाठी कारणीभूत असतो. ह्या मागे अत्यंत गुंतागुंतीची कारणे असतात.

ह्याशिवाय जन्मतः असणारे पांढरे तीळ, रबर किंवा प्लास्टिकच्या रसायनांमुळे, किंवा मान,पाठ,छाती ह्यांवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शनमुळे देखील असे पांढरे डाग येतात.

ह्यावरून आपल्या लक्षात येईल की कोड आणि कुष्ठरोग हे दोन वेगळे रोग आहेत. हा संसर्गजन्य नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कोडाचे चार प्रकार आहेत. जनरल कोड ह्यामध्ये पुर्ण शरीरावर असे पांढरे डाग असतात.

लोकलाईज्ड कोडमध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी असा डाग येतो. सेगमेंटेड कोडमध्ये एका पट्टयामध्ये हे डाग येतात. अक्रोफेसिएल कोड मध्ये शरीराच्या टोकाच्या अंगाला म्हणजे बोटं, ओठ, तळहात किंवा तळपाय अशा ठिकाणी कोडाचे डाग येतात.

ही केवळ शारीरिक गोष्टींमुळे होणारी घटना आहे. त्यासाठी मांत्रिक-तांत्रिक, पूजा-पाठ ह्यांसारख्या अंधश्रद्धांना बळी पडण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार, सूर्यप्रकाश ह्यामुळे कोड कमी होण्यास मदत होते.

Credit : भक्ती संदिप 

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.