मराठी मधील लोकप्रियता मिळवलेली एक प्रसिद्ध मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. होय, याच मालिकेत राणाला कुस्ती शिकवण्यासाठी आलेली सखी म्हणजेच दुसरी कुणी नसून अभिनेत्री ऋचा आपटे होती. पण याच ऋचा ने वैवाहिक जीवनाची सुरुवात केलीय ! धक्कादायक आहे ना ? म्हणजे कुणाला सांगितले की नाही हेही माहीत नाही. हिने गुपचूप साखरपुडा केला असल्याचे आपल्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांना कळवले आहे. आता मग चाहते म्हणणार चं ना की इथ कुणालाच मेळ लावून दिला नाही.
तस गुपित तिने याआधी ही काही गोष्टी केल्या होत्या. त्या म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी तिने हा साखरपुडा केला असल्याने तिच्या चाहत्यांना हा सुखद धक्का बसला आहे. बरं आपल्याला प्रश्न पडला असेल की तिने नेमकं कुणासोबत आयुष्यात एकत्र राहण्याची निवड केली असेल ? तर मग चला सविस्तर जाणून घेऊयात.
अभिनेत्री ऋचा आपटे हिने मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेता क्षितिज दाते सोबत हा साखरपुडा केला असून त्याने देखील आजच ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोघांनी ही सोशल मीडियावर ही बातमी कळवली आणि सगळीकडे एकच चर्चा रंगायला लागली.
तसं पहिलं तर त्यांनी काही अरेंज मॅरेज केलेलं नाही आहे. म्हणजे ते दोघे आधी एकमेकांना ओळखतात. सोबत कामेही केलेली आहेत. अभिनेत्री ऋचा आणि क्षितिज बन मस्का या झी युवावरील मालिकेतून एकत्रित काम करत होते. त्यामुळे इथेच त्यांच्या प्रेमाचे सूर जुळून आले असे म्हणायला हरकत नाही. कारण सिने इंडस्ट्रीत हेच गणित पूर्वीपासून चालत आलेलं आहे की एकत्र कामे केली की प्रेमात रंग भरू लागतात.
मुळशी पॅटर्न फेम क्षितिज दाते हा मूळचा पुण्याचा. तो अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. म्हणजे दिग्दर्शन म्हणून त्याचे नाटकांत बरेच केलेलं आहे. आणि पुरुषोत्तम करंडक पासून तो लोकप्रिय ही आहे.
तयाचं खरं नाव आणि अभिनयाची लाजवाब चर्चेत आला तो मुळशी पॅटर्न मुळेच. मुळशी पॅटर्न चित्रपटात त्याने साकारलेली गण्याची भूमिका अधोरेखित करणारी ठरली आहे. ती लोकांना जवळची वाटली. गाजली सुद्धा.
बरं तो प्रवीण तरडेंच्या दुसऱ्या सिनेमात आहे. म्हणजे मुळशी पॅटर्न याशिवाय सरसेनापती हंबीरराव या आगामी चित्रपटातही तो एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
प्राणी- मात्र या पुरुषोत्तम करंडक मध्ये गाजलेल्या एकांकिकेचं दिग्दर्शन त्याने करून लोकप्रियता मिळवली होती. याच सोबत मालिका, नाटक आणि चित्रपटातून तो सक्रिय असलेला पाहायला मिळतो आहे.
तर ऋचा आपटे सोनी मराठी वाहिनीवरील अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारत आहे. याशिवाय अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. तब्बल एक वर्षानंतर या दोघांनी केलेल्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांनी तसेच कलाकारांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोघांनी एकत्र येऊन वेईव जीवनाची केलेली सुरुवात आणि त्याचं पहिलं पाऊल खूप आनंदात भर टाकणारं आहे. कारण जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर ते आयुष्याच्या साथी दाराच्या भूमिकेत शिरलं पाहिजे. तर त्यासाठी या दोन्ही कलाकारांना खूप खूप शुभेच्छा.