बॉलिवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्री हे सतत कोणत्या ना कोणत्या मार्गानी इंडस्ट्रीत चर्चेत असतात. मग ते इंस्टा असो नाहीतर फेसबुक. सध्या एक प्रसिद्ध लोकप्रिय हिंदी अभिनेत्री चर्चेत आलेली आहे. जिचं नाव आहे, कतरीना कैफ. आपण सर्व ओळखत असाल तिला. जिने खुप कामे केली आहे. आणि खूप लोकांच्या रिलेशन सोबत ही होती.

मग रणबीर असो किंवा सलमान. सध्या मात्र ती विकी कौशल बरोबर रिलेशन मध्ये असल्याचं कळतंय. ते तिचा असा नेमका इंस्टा वर कोणता व्हिडीओ व्हायरल झाला चला ते पाहुयात.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे तर कधी तिच्या डान्स व्हिडीओमुळे. आपल्या अनोख्या अंदाजात चाहत्यांची मनं जिंकण्याचा ती अनेकदा प्रयत्न करत असते.

सध्या सोशल मीडियावर कतरिनाचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर कतरिनाने तिचा डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कतरिनाने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओ २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. मात्र, अचानक ही प्रॅक्टिस सोडून ती मस्तीच्या मूडमध्ये डान्स करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

‘..आणि बऱ्याच काळानंतर, आम्ही डान्स करतोय’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

मात्र, या व्हिडीओतील गाणं म्यूट करण्यात आलं आहे. त्यामुळे कदाचित कतरिना तिच्या आगामी चित्रपटासाठी ही डान्स प्रॅक्टिस करत असल्याचं म्हटलं जात आहे.

याच दरम्यान, आपल्या मस्तीखोर अंदाजासाठी कायम चर्चेत असणारी कतरिना लवकरच ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. तर, ‘सूर्यवंशी’ व्यतिरिक्त ती ‘फोन भू’त’ या आगामी चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीदेखील झळकणार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.