झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘कारभारी लयभारी’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ह्यातील सर्वच कलाकार रसिकांचे लाडके बनले आहेत. ह्याच मालिकेतील एका अभिनेत्रीला भररस्त्यात मा’र’हा’ण केल्याची ध’क्का’दा’य’क घटना मुंबईत घ’ड’ली आहे.

कारभारी लयभारी मालिकेत गंगा हे पात्र साकारणारी गंगा रोजच्या सारखं शूटिंग सं’प’वू’न घरी निघाली होती. घरी जाण्यासाठी नेहमी प्रमाणे ती बस स्टॉपवर वाट पाहत थांबली होती. तेव्हा तिथे काही लोक आले आणि त्यांनी अचानक गंगाला मा’र’हा’ण करायला सुरुवात केली.

गंगासोबत तेव्हा गंगाचा एक मित्र देखील होता. त्याने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तरीदेखील ती व्यक्ती गंगाला मा’र’हा’ण करत राहिली. जवळजवळ 25 मिनिटे त्या व्यक्तीने गंगाला मा’र’हा’ण केली.

घटनेबद्दल सांगताना गंगा म्हणाली त्यावेळी रस्त्यावर अनेक लोक उपस्थित होते. पण कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली. अनेकांचा आदर्श असलेली गंगा मात्र स्वतःवर वेळ आली तेव्हा एकटी प’ड’ली.

झालेल्या प्रकारानंतर गंगा कशीबशी रिक्षा करून घरी जाण्यासाठी निघाली. रिक्षातूनच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून घडलेली घ’ट’ना सांगत एक व्हिडिओ शूट केला आहे. “मी कुठे जाऊ? कोणाची मदत घेऊ? प्लीज मला सांगा” असे बोलत र’ड’ता’ना तिने हा व्हिडीओ केला आहे.

झालेल्या प्रकाराची दखल घेत मुंबई पो’लि’सां’नी गंगाला मदत केली आहे. पो’लि’सां’च्या मदतीसाठी गंगाने त्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यात ती म्हणत आहे की, “आज हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण खास आहे. आता मी थोडी बरी आहे. जो काही प्रसंग घडला त्यातून मी सावरले आहे. पण, या व्हिडीओच्या माध्यमातून मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. सगळ्यात प्रथम मुंबई पो’ली’स, मुंबई आयुक्त यांचे मी अगदी मनापासून आभार मानते.

त्यांनीच मला सगळ्यात आधी मदतीचा हात दिला. या गोष्टीसाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी असेन, त्यानंतर दुसरे आभार पंतनगर पो’ली’स स्टे’श’न’म’धील पो’ली’स आणि अन्य कर्मचाऱ्यांचे. त्यांनीदेखील एकही सेकंद व्यर्थ न घालवता मला मदत केली आणि तिसरे आभार तुम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकांचे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. असंच प्रेम कायम करत राहा.’

गंगा ही एक ट्रा’न्स’जें’ड’र असून तिचे मूळ नाव प्रणित हाटे आहे. ह्यापूर्वी गंगा ‘युवा डान्सिंग क्वीन’ ह्या कार्यक्रमात अभिनेता अद्वैत दादरकर सोबत सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ट्रा’न्स’जें’ड’र असल्याने गंगाचा हा प्रवास ख’ड’त’र होता. पण आपल्या कलागुणांनी ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.