साधारण आठ वर्षांपूर्वी ‘कुबुल है’ ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या खास करून तरुणांच्या मनावर राज्य केले होते. ह्या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय झाली होती. असद आणि झोया ह्या जोडीने तर त्यांच्या प्रेमकथेतून अनेक तरुणींना भुरळ घातली होती. हे पात्र साकारणाऱ्या करण सिंग ग्रोव्हर आणि सुरभी ज्योती ह्यांच्यावर प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करतात.

आगामी टीव्ही शो कुबूल है 2.0 मधून अभिनेता करण सिंग ग्रोव्हर असदच्या रूपात छोट्या पडद्यावर परतणार आहे. कुबूल है मधील सुरभी ज्योती बरोबरच्या त्याच्या ऑन-स्क्रीन रोमान्सचे खूप कौतुक झाले होते आणि ही मालिका चांगलीच

मालिकेबद्दल करण म्हणाला “कुबूल है” ही मालिका नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल. कुबूल है 2.0 चा ट्रेलर पाहिल्यानंतर मला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. मुली असदच्या प्रेमात असल्याचे दिसून येते. आशा आहे की मी त्यांना निराश करणार नाही.”

यापूर्वी सीझन दोनच्या घोषणेनंतर करणने म्हटले होते की, “कुबूल है ने आठ वर्षांपूर्वी स्टिरियोटाईप्स तोडले होते आणि ह्यावेळी पुन्हा तसे होईल. या कथेची पार्श्वभूमी मुख्य जोडप्याच्या आसपास असेल. यावेळी, असद आणि झोयासाठी दांव खूपच जास्त आहे आणि शिवाय आंतरराष्ट्रीयस्तरावर आहे. पण असद आणि झोयाचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी शोच्या मूळ मालिकेच्या धर्तीची आठव

शोच्या निर्मात्यांनी शोचा टीझर रिलीज केला असून. झोया फारुकीची मुख्य भूमिका साकारणा सुरभी ज्योतीनेही तिच्या इंस्टाग्रामवर टीझर शेअर करत, “खरी प्रेमकथा कधीच संपत नाही … #asadandzoyaforever” असे कॅपशन दिले आहे.

ह्या टीझरवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत आणि सर्व कलाकारांचे कौतुक करीत आहेत. ह्यामुळे करणसिंग ग्रोव्हर आणि सुरभी ज्योती हे देखील ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरवात झाली आहे.

मालिकेचे शूटिंग सर्बियातील बेलग्रेड येथे करण्यात आहे. अंकुश मोहला आणि ग्लेन बॅरेटो दिग्दर्शित या शोमध्ये आरिफ जकारिया, मंदिरा बेदी, कविता घई आणि गुलफाम खान हेदेखील आहेत. एमएजे प्रॉडक्शनच्या बॅनरखाली मृणाल अभिज्ञान झा ह्या मालिकेची निर्मिती करत असून. ही मालिका 10- एपिसोड्सची असेल. 12 मार्च 2021 रोजी झी 5 ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

कुबूल है व्यतिरिक्त, करण दिल मिल गये आणि कसौटी जिंदगी के 2 सारख्या शोमध्ये त्याच्या भूमिकांमुळे लोकप्रिय झाला आहे.