‘Kachcha Limbu’ Film’s Trailer Launched

797
‘Kachcha Limbu’ Marathi Movie Trailer Launched कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर लॉंच!
अभिनेता प्रसाद ओकचा स्वतंत्र दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून रवी जाधव यांचा पहिला चित्रपट, सिनेमाचा ब्लॅक अँड व्हाईट क्लासिक लूक, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर,मनमीत पेम,अनंत महादेवन अशी तगडी स्टारकास्ट या कारणांमुळे ‘स्पेशल’ ठरलेल्या स्वरूप रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत आणि टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स आणि मंदार देवस्थळी निर्मित कच्चा लिंबू या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच देखील असाच स्पेशल साजरा झाला.
 ‘Kachcha Limbu’ *’कच्चा लिंबू’* या चित्रपटाचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी’ या ट्विटर हँडल द्वारे ‘ट्विटर लाइव्हच्या’ माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपीत झाला, या वेळी चित्रपटातील कलाकार म्हणजेच रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर,मयुरेश पेम,अनंत महादेवन, उदय सबनीस दिग्दर्शक प्रसाद ओक, छायाचित्रकार अमलेंदू चौधरी   निर्माता मंदार देवस्थळी उपस्थित होते.
साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सांगणारा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.