Kaccha Limbu Teaser | Ravi Jadhav | Sonali Kulkarni

कच्चा लिंबू’ चा टीजर प्रदर्शित!
‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ या आगळ्या वेगळ्या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या Kaccha Limbu ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. साध्या सरळ अपेक्षा असतात आयुष्याकडून, पण कधी कधी वरच्याच्या मनात आपल्यासाठी काही वेगळेच प्लॅन असतात आणि मग अचानक हे साधं, सरळ वाटणारे आयुष्य स्पेशल होऊन जाते. या अनपेक्षितपणे आलेल्या वळणाला हसतमुखाने सामोरे जाणे म्हणजेच आयुष्य जगणं असतं. असंच साधं सरळ पण तितकंच ‘स्पेशल’ असणारं काटदरे कुटुंब आपल्याला प्रसाद ओक दिग्दर्शित Kaccha Limbu ‘कच्चा लिंबू’ च्या टीजर मध्ये दिसतं.
स्वरूप रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत आणि टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स आणि मंदार देवस्थळी निर्मित कच्चा लिंबू या चित्रपटामध्ये आयुष्याच्या खेळामध्ये कच्चा लिंबू ठरून देखील हसत खेळत आयुष्य स्पेशल बनवणाऱ्या काटदरे कुटुंबियांच्या रुपात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून सचिन खेडेकर, अनंत महादेवन यांची देखील या चित्रपटात विशेष भूमिका आहे.
प्रसाद ओक याचे दिग्दर्शन, रवी जाधव यांची प्रमुख भूमिका, चित्रपटाचा ब्लॅक अँड व्हाईट लुक यामुळे चर्चेत असणारा Kaccha Limbu ‘कच्चा लिंबू’ येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.