हाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे. मंगलमय वातावरणात विघ्नहर्ताचे आगमन होत आहे…‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा आणि घाडगे & सून मालिकेमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात होणार आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनाने सिध्दी – शिवा आणि अमृता- अक्षय त्यांच्या आयुष्यातील विघ्न देखील बाप्पाने दूर करावीत हीच मनोकामना बाप्पा चरणी मागणार आहेत …

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा – सिध्दीच्या लग्नानंतर बाप्पाचे मोठ्या जल्लोषात लष्करेंच्या घरामध्ये आगमन होणार आहे… ढोल ताश्याच्या गजरामध्ये सोनी आणि शिवा यांनी बाप्पासी स्थापना करणार आहेत… सिध्दी, काकू आणि सोनी यांनी खास मोदक बनवले आहेत… घरामध्ये स्पर्धा होणार आहे आता ही स्पर्धा कसली असणार ? आरतीचा मान कोणाला मिळणार ? हे कळेलच. तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

घाडगे & सून मालिकेमध्ये घाडगे सदनमध्ये बाप्पाचे आगमन मोठ्या उल्हासात झाले आहे… बाप्पाची स्थापना, पूजा निर्विघ्नपणे पार पडते…पण माई आणि अमृता जरा चिंतेत आहेत कारण अक्षयने जे खोटे सांगितले आहे ते वसुधाने माई आणि अमृतासमोर उघड केले आहे, की कियाराचे बाबा पैसे देणार नाहीत. यातच भर म्हणजे अमृताचे वडील त्याचे बॉस आनंद यांना घेऊन येतात आणि सगळ्यांना सांगतात अमृताचे लग्न त्याच्यासोबत ठरवले आहे. विघ्नहर्त्याच्या येण्याने हे संकट देखील दूर होईलच… पुढे काय घडेल हे कळेलच… तेंव्हा नक्की बघा घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.