गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियामधील जंगलं जळत आहेत. असे सांगितले जाते की अंदाजे चार महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामधील जंगल ही अग्नीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. अशा परिस्थितीत तेथील वन्यजीवांना खूप मोठी हानी होते आहे. आपण इंटरनेटवर गेली अनेक दिवस हृदयद्रावक अशी छायाचित्र बघत आहोत. यामध्ये प्राण्यांना अतोनात हानी झालेली आहे. या अग्नी नाट्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना बेघर होण्याची वेळ देखील आलेली आहे.

अशा परिस्थितीत तेथील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक इतरांना मदत करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आपण बघू शकतो. या सर्व मदत करणाऱ्यांमध्ये एक भारतीय दांपत्य पुढाकार घेताना आपल्याला दिसून येईल, यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात मदत कार्य चालवलेले आहे.

कंवलजीत सिंह हे गेली सहा महिने ऑस्ट्रेलिया मध्ये वास्तव्य करत आहेत. कंवलजीत सिंह आणि त्यांचं कुटुंब पूर्व विक्टोरिया परिसरामध्ये बन्सबर्ग भागात “देसी ग्रील” म्हणून एक हॉटेल चालवतात. हे कुटुंब गेली अनेक दिवस बेघर झालेल्या लोकांना मोफत अन्न पुरवण्याचं काम करत आहे.

सिख वॉलेटींयर्स ऑस्ट्रेलिया या संस्थेच्या मार्फत एक स्वयंसेवी संस्था चालविण्यात येते. गेल्या काही दिवसातील घटनांमुळे त्यांच्याकडे अनेक शरणार्थी आलेले आहेत, यातील अनेकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीयेत अशा परिस्थितीत एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने या सर्वांना मदत केली ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.

कंवलजीत सिंह आणि त्यांचे कुटुंब आपल्या रेस्टॉरंटमध्ये अन्न तयार करून त्या एनजीओला देतात आणि या एनजीओ मध्ये शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांना मदत करतात. दिवसातून कमीत कमी पाचशे ते हजार लोकांना ही मंडळी सक्षम पणे पोटभर अन्न देत आहेत.

आपल्याला माहिती असेलच की दक्षिण आणि पूर्व ऑस्ट्रेलियामधील जवळपास 1.23 करोड एकर क्षेत्र या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. अशातच ऑस्ट्रेलियातील सरकारने देखील तीन वेळा आणीबाणी जाहीर केलेली आहे. या आगीमुळे हजारोंच्या संख्येने लोक घर सोडून बाहेर विस्थापित होताना दिसून येत आहेत.

या आगीमुळे आतापर्यंत एकवीस लोकांचा जीव देखील गेलेला आहे. यासोबतच अनेक नागरिक अजूनही गायब आहेत. अशा भयावह परिस्थितीत भारतीय वंशाच्या या कुटुंबाने तेथील नागरिकांना मदत करुन खरच एक मोठं काम केलेल आहे. त्यांच्या या चांगल्या कामाची दखल भारत-ऑस्ट्रेलिया सोबतच पुर्ण जग घेत आहे. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.