काही दिवसांपूर्वीच भारताच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार असलेल्या विराट कोहलीने त्याला बाळ झाल्याची गुड न्यूज सर्वांना दिली. विराट आणि पत्नी अनुष्काने त्यांच्या बाळाचं नावदेखील ठेवलं. आणि आता अशातच क्रिकेटविश्वातला भारताचा एक अतिउत्कृष्ट फिरकीपटू असलेला हरभजन सिंग अर्थातचं सर्वांचा लाडका भज्जी एक गुड न्युज देताना पहायला मिळतो आहे.

हरभजन सिंग आणि बॉलीवुडमधे काम करणारी गीता दोघांच लग्न झालं, आणि दोघांनाही एक मुलगी आहे. परंतु आता दोघांच्या आयुष्यात आपल्या मुलाबाळांचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण हरभजन सिंग याला आता दुसर्‍यांदा नव्या बाळाची चाहूल भेटलेली पहायला मिळते आहे. याबाबत खरतरं खुलासा गीताकडून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनच करण्यात आला आहे. आणि तिने या गोड बातमीसोबतच अगदी सुंदर असे फोटोजदेखील शेअर केले आहेत.

या नव्या बाळाच्या स्वागताला आता केवळ हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा हे दोघेच असणारं असं नाही तर त्यांची आधीची मुलगीदेखील आपल्या नव्या भावंडाच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याची पहायला मिळते आहे. गीताच्या अकाउंटवरून हे फोटो शेअर होताच, ही बातमी अगदी तुफान वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

त्यात आपल्या हरभजन सिंगचे लाखो-करोडो चाहतेदेखील आहेत. मुळात हरभजनच्या आयुष्यात आलेल्या या आनंदावर अनेक क्रिकेटपटूंनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचाही पहायला मिळतो आहे. सुरेश रैना व त्याची पत्नी या दोघांनीही या फोटोंवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कुटुंबातल्या नव्या सदस्याच स्वागत करायला हरभजन सोबतचं त्याचं सर्व कुटुंबही आता फारच हर्षाने सज्ज झाल्याचं पहायला मिळतं आहे.

गीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोवरील कॅप्शनवरून तिच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची एकप्रकारे अंदाजे तारीख दिल्याचंही पहायला मिळालं. जुलैच्या महिन्याभरात ती कधीही पुन्हा दुसर्‍यांदा आई होऊ शकेल असं तिच्या कॅप्शनवरून समजून येत आहे. हरभजन सिंग आणि गीता दोघेही या बाळाच्या जन्म घेईपर्यंतच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटताना आता पहायला मिळतं आहेत.

हरभजन आणि गीता त्यांच्या पहिल्या मुलीला अर्थातचं हिनायाला आता घरातलाच हक्काचा मेंबर सोबत खेळण्या-बागडण्यासाठी घेऊन येणार. गीता आणि हरभजन यांची केमिस्ट्री खरतरं फार भन्नाट स्वरूपाची असलेली पहायला मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघातील एके काळचा फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या कारकिर्दीत अनेक कारणांनी प्रसिद्धी झोतात राहिला असल्याच आपल्याला पहायला मिळालं. खरं म्हणजे, हरभजन सिंगच्या आयुष्यात कॉन्ट्रोवर्सी बऱ्याच निर्माण झाल्या.

तरीदेखील हा पंजाबी माणूस मस्तपैकी हरफनमौला मिजाज बागडत कायम इतरांचं क्रिकेटसोबतच मनोरंजनही करत राहिला. पुढे हरभजन सिंग गीतासारख्या गोड मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी विवाहबंधनात अडकला. अर्थातचं गीता ही एक सिनेसृष्टीतली उत्कृष्ट मॉडेल आहे. गीताने तमाम क्रिकेटविश्वात भारताच्या “टर्बनेटर” म्हणून ओळख असलेल्या हरभजन सिंगसोबत लग्न केलं.

मुळात आता हरभजन याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तो क्रिकेटमधे असताना त्याचे नाव अनेक सिनेअभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमधे जोडल्या गेल्याचे सर्वांना माहितच आहे. हरभजनला सर्वप्रथम एका गाण्यातून पडद्यावर दिसलेली गीता मनात भरली. आणि त्यानंतर हरभजनने एकही पाऊल मागे न टाकता थेट तिच्याशी लग्नगाठ बांधली. आणि पाहता पाहता आता गीता व हरभजन या दोघांचा हा प्रवास दुसऱ्या बाळाच्या जन्मापर्यंत येऊन पोहोचला आहे, हे निश्चितच खास आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!