आज बिग बॉस मराठीच्या घरा मध्ये खांब खांब हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे… या कार्यामध्ये सदस्यांना खांब पकडून त्याच्यावर त्यांच्या नावाचे स्टीकर चिकटवायचे आहे … आणि यावरूनच सदस्यांमध्ये वाद होणार आहेत… आरोह आणि शिवमध्ये देखील याच मुद्यावरून वाद रंगला आहे… या टास्कमध्ये बिग बॉस यांनी सगळ्या सदस्यांना घराचा कॅप्टन होण्याची संधी दिली आहे… त्यामुळे आता ही संधी कोणीच गमवू इछित नाही आणि कॅप्टन होण्यासाठी सगळेच सदस्य जीव तोडून प्रयत्न करणार हे निश्चित… याचवेळेस टास्क मध्ये शिवानीने अभिजीत बिचुकले यांनी धरलेल्या खांबाला तिचे नाव चिकटवले…

अभिजीत केळकर याचे नाव असलेले स्टीकर तो खांबाला चिकटवण्याआधीच अभिजीत बिचुकले यांनी त्यांचे नाव असलेले स्टीकर अभिजीत केळकर याने पकडलेल्या खांबाला चिकटवले… या कार्याची हीना संचालिका आहे…अभिजीत केळकरचे म्हणणे पडले अस नाही होऊ शकत … त्यावर हीनाने सांगितले मी आधीच सांगितले होते ज्याच्या नावाचे स्टीकर मला खांबावर आधी दिसेल ते ग्राह्य पकडले जाईल…

अभिजीत केळकरचे म्हणणे पडले स्टीकर लावणे हा टास्क नाहीये… त्यावर बिचुकले म्हणाले स्टीकर लावणे हाच टास्क आहे कारण असावे काहीवेळा पूर्वी शिवानीनेदेखील तेच केले. त्यावर शिव म्हणाला जो प्रकार झाला कॅमेराला एकदा सांगून ठेव… आता बघूया कोण चूक कोण बरोबर ? हे कळेलच बिग बॉस मराठी सिझन 2 आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.