मित्रांनो!, अभिनेत्री तापसी पन्नू या नावाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने तिच्या प्रत्येक चित्रपटातून रसिकांच्या मनावर आपली छाप सोडलेली आहे. तापसीने साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तापसीने सूरमा, मुल्क आणि मनमर्जियांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही चर्चा झाली तापसीच्या प्रोफेशनल लाईफची. आता आम्ही तुम्हाला तापसीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगतो, ज्याबद्दल स्वतः तापसीने खुलासा केला होता. तिनेच स्वतः खुलासा केलेली तिची पहिली प्रेमकथा, खास आमच्या रसिक वाचकांसाठी…
तापसी पन्नू नुकतीच एका मीडिया इव्हेंटमध्ये उपस्थित होती. येथे तिने तिच्या खाजगी आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से शेअर केले. ज्यात तिने तिच्या पहिल्या प्रेमाशी संबंधित एक अनोखा किस्साही सांगितला. तापसीने सांगितले की, जेव्हा ती नववीत होती, तेव्हा ती दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. पण या दरम्यान बॉयफ्रेंडच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. यामुळे त्याने तापसीशी ब्रेकअप केले. यानंतर, तापसी खूप रडली होती.
तापसीने सांगितले होते की तिला अजूनही आठवते की तिच्याकडे त्यावेळी मोबाइल नव्हता. अशा परिस्थितीत ती पीसीओ बूथवर जाऊन तिच्या प्रियकराला फोन करायची. ब्रेकअपनंतर तापसीने तिच्या बॉयफ्रेंडला ब्रेकअपचे कारणही विचारले. तापसी म्हणाली होती की, आता जेव्हाही ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येते तेव्हा तिचे पहिले काम त्या व्यक्तीला समजून घेणे आणि त्याचा आदर करणे असते. त्याच वेळी, त्यांचा जीवनसाथी देखील असा असावा की ते त्यांना चांगले समजू शकतील.
नुकतेच तापसीने तिच्या प्रायव्हेट लव्ह लाइफविषयी काही खुलासे केले आहेत. तापसीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटसृष्टीतल्या कोणासही डेट करत नसून ती डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू मॅथियस बोईशी डेटिंग करीत आहे. २०१५ च्या युरोपियन गेम्समध्ये मॅथियसने सुवर्णपदक जिंकले होते. या मुलाखतीत, तापसी तिच्या वैयक्तिक जीवनावर उघडपणे बोलली. मॅथियास डेटिंगच्या प्रश्नावर ती म्हणाली की, “मला चित्रपटसृष्टीत कोणालाही डेट करायचे नव्हते कारण मला माझे वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवन वेगळे ठेवायचे आहे.
जे लोकं माझ्यासाठी खास आहेत आणि ज्यांच्यावर मी प्रेम करते अशाच काही जिवलगांची छायाचित्रे मी माझ्या वाढदिवशी शेअर करत असते. माझ्या बॉयफ्रेंड मॅथियासबरोबरही मी असेच केले.” लग्नाविषयी, तापसी म्हणाली की, “जेव्हा आमचा निर्णय होईल तेंव्हा आम्ही ते कळवूच पण त्यावेळी मात्र आतासारखे वर्षात ५ ते ६ चित्रपट करण्याऐवजी मी २ किंवा ३ च चित्रपट करेल. जेणेकरून आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याला देण्यासाठी पुरेसा साठी वेळ असेल.”
तापसीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, तापसी पन्नूचा रश्मी रॉकेट चित्रपट नुकताच आला आहे, जो Zee5 वर पाहता येईल. यानंतर, अभिनेत्री लवकरच बायोपिक स्पोर्ट्स फिल्म ‘शाबाश मिठू’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे, तिचे चाहते अभिनेत्रीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.