ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

 

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये हरिष दुधाडेची एन्ट्री !

रणजीतच्या येण्याने सरस्वती पुढे कोणती नवी आव्हाने

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका सरस्वती Sarswati मध्ये सरस्वती आणि राघव यांचा सुखाचा संसार सुरु होता. आजवर सरस्वती Sarswati  च्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. सरस्वती Sarswati  ने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले, आपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिली, मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले होते. तसेच तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली. पण, आता अचानक  राघवच्या मृत्यूमुळे सरस्वती पूर्णत: खचून गेली आहे,तिला पुढे काय करावे हे कळत नाहीये आणि त्यामध्ये तिच्यावर आता कान्हाची जबाबदारी देखील असल्यामुळे तिला आता खंबीर आधाराची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये आता मालिकेत राघवच्या सावत्र भावाची म्हणजेच रणजीतची एन्ट्री होणार आहे. रणजीतची भूमिका माझे मन तुझे झाले मालिकेतील हरिष दुधाडे साकारणार आहे.

मालिकेमध्ये विद्युल आणि भिकू मामाच्या कारस्थानांना काही पूर्णविराम लागत नाहीये. सरस्वतीला मारण्याच्या कारस्थानानंतर आता त्यांना वाडा आणि संपत्ती मिळवायची असून त्यांच्या या हेतूमध्ये सरस्वती Sarswati  आणि कान्हा एक अडथळा असणार आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे विद्युलने तिची कारस्थान आणि हेतू पूर्ण करण्यासाठी तिच्या मुलाला म्हणजेच रणजीतला बोलावून घेतले आहे. आता रणजीतच्या येण्यामुळे सरस्वतीच्या आयुष्याला कलाटणी मिळणार का ? सरस्वतीच्या आयुष्याचा हरवलेला आनंद रणजीत पुन्हा मिळवून देईल का ? विद्युलला तिच्या कारस्थानांमध्ये यश मिळेल का ? रणजीत खरोखरच त्याच्या आईला मदत केरल कि, तो सरस्वतीच्या बाजूने उभा राहील ? हे सगळच बघण रंजक असणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती फक्त कलर्स मराठीवर.