ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

 

Gudhi Padwa special  Colors Marathi 2 MAD Show with Sai Tamhankar.

2 MAD च्या मंचावर सई ताम्हणकरने केला नवा संकल्प!

‘आत्मविश्वासानं नृत्य करण्याचा सई करणार प्रयत्न’

2 MAD या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शोमध्ये TOP 10 ची निवड झालेली असून आता या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्याची चढाओढ चांगलीच रंगत आहे. या  मंचावर अनेक कलाकारांनी हजेरी लावली आणि स्पर्धकांना अधिक चांगल्याप्रकारे नृत्य करण्यास प्रोत्साहित केले ज्यामध्ये स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अहमद खान याबरोबरच बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत यांचा समावेश आहे. गुढीपाडव्यानिमित्त मराठी प्रेक्षकांची लाडकी तसेच जिने अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान बनवले आहे अशी सई ताम्हाणकर 2 MAD च्या मंचावर येऊन गेली. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचा MADness, उत्साह, आणि त्यांचे नृत्याबद्द्लचे प्रेम लक्षात घेऊन सई या मंचावर आली. तिने स्पर्धकांशी दिलखुलास संवाद साधला आणि सगळ्यांची मने जिंकली. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा गुढीपाडवा विशेष भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे येत्या २७ आणि २८ मार्च रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

प्रेक्षकांना स्पर्धकांच्या नृत्यामधून लोककलेचा अनुभव घेता येणार आहे, ज्यामध्ये भारुड, जोगवा, कोळी नृत्य, गोंधळ, धनगर नृत्य या नृत्यशैलींचा समावेश आहे. पलकने लल्लाटी भंडार, मितालीने सुंदर नाट्यसंगीतावर नृत्य सादर केले तर श्रीदळवीने विंचू चावला आणि तुषारने डोकं फिरलंया हा गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सईचे मन जिंकले. सईने सोनल विचारेचं विशेष कौतुक केलं आणि ती सईची लाडकी स्पर्धक आहे असे देखील ती म्हणाली त्यामुळे सोनलला आनंद झाला. 

तुषारने सईने सोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सईने त्याची ही इच्छा लागलीच पूर्ण केली. आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर नृत्य करायला मिळाले म्हणून तुषारला खूप आनंद झाला. 2 MAD च्या मंचावर सईने आपल्या नृत्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आणि तिचा नवीन वर्षाचा संकल्प प्रेक्षकांना सांगितला. “नवीन वर्षात मीconfidently डान्स करायला शिकणार आहे” असे ती म्हणाली.

 

तेंव्हा बघायला विसरू नका 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा गुडीपाडवा विशेष भाग २७ आणि २८ मार्च रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here