‘गोलमाल अगेन’ मध्ये ‘बिंग ह्युमन’
‘गोलमाल अगेन’ या आगामी सुपरहिट बॉलीवूड चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांकडून तसेच प्रसारमाध्यमांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज धमाक्यातील हा एक नवाकोरा ‘फटाका’ असून, ह्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगपासूनच ‘गोलमाल अगेन’ ची लागलेली रसिकांमधील उत्सुकता आजही तसूभर कमी झालेली नाही.
नुकतेच सलमान खानने या सिनेमातील ‘मेने तुजको देखा’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो ट्वीट करत, सिनेमाच्या संपूर्ण टीमला आपल्या शुभेच्छा दिल्या. यात ‘बिंग ह्युमन’ ची सायकल वापरण्यात आली असून, हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
रिलायन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, मंगलमूर्ती फिल्म्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्स यांच्या सहकार्याने रोहित शेट्टीची निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला ‘गोलमाल अगेन’ हा सिनेमा 20 ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होत आहे