बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके घराबाहेर पडला, ज्यामुळे शिवानीआणि नेहा आता घरामध्ये एकट्या पडल्या आहेत. आज नेहा शिवानीकडे तिचे मन मोकळं करताना दिसणारआहे… या दरम्यान दोघींना अश्रू अनावर झाले. नेहाने शिवानीला सांगितले “माझ्या मनामध्ये कधीचतुमच्याबद्दल वाईट विचार आले नाही”. यावर शिवानीने नेहाला सांगितले “आता आपण एकत्र राहायचे आहे, अजिबात भांडायचे नाहीये”. शिवानीने नेहाची माफी देखील मागितली आणि तिला सांगितलं कि, मी जर बोललेनसते तर माझ्या मनामध्ये राहिले असते… त्यावर नेहाचे म्हणणे आहे, मला त्या गोष्टीचा राग आला नाहीये, पणमला वाईट वाटले, कारण माणूस म्हणून मी खरंच इतकी वाईट नाहीये, मी गेम वैगरे नाही खेळणारतुमच्यासोबत.

 शिवनीचे म्हणणे पडले, मी काहीतरी कारणास्तव सांगत होते कि असं वागणं बंद करा.  त्यामागेकाहीतरी भक्कम कारण होतं. तो त्याच्या पण कारणामुळे गेला असावा बाहेर पण, काय होत एखादा माणूसचुकीचा दिसायला लागतो, तो मूर्ख होता बोलायचो.नेहाने शिवानीला सांगितले, “मी एका दिवसात दोन माणसंनाही गमावू शकतं”.

आता बघूया पुढे घरामध्ये काय होईल ? शिवानी आणि नेहाची मैत्री अशीच टिकून राहील का घरामध्ये ? कि अजूनगैरसमज होऊन भांडण होतील … तेंव्हा बघायला विसरू बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्याकलर्स मराठीवर.