गिरीजा ओकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
स्टार प्रवाहवरील ‘गं सहाजणी‘ मालिकेत महत्त्वाची भूमिका
जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकनं तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजतआहे. ही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानं छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवरील ‘ग सहाजणी’ ( Ga Sahajani) या मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी गिरीजा सज्ज आहे. एका बँकेत काम करणाऱ्यासहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका येत्या १० ऑक्टोबर पासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. या मालिकेत गिरीजा ओक ‘विद्या विसपुते’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
बँकेची ब्रांच हेड असलेली विद्या विसपुते साधी, सरळ आणि समजूतदार अधिकारी आहे. बँकेतल्या लोकांनी चुका कराव्यात आणि तिने उदार मनाने त्या सांभाळून घ्याव्यात अशी तिची आदर्श व्यक्तिरेखाआहे. या व्यक्तिरेखेसाठी गिरीजाही उत्सुक आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची ‘गं सहाजणी’ ही कलाकृती प्रेक्षकांना निखळ आनंद देणारी, मनोरंजक आहे. गिरीजा ब्रांच हेड असलेल्या या बँकेत शर्वणीपिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोंडवळकर या अभिनेत्री मुख्य पदांवर आहेत. रोजच्या जीवनातील दगदग, समस्या आणि नोकरीवर जाणाऱ्या महिलांचं भावविश्वमांडणारी ही मालिका आहे. या सहाजणी’ मिळून काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.