ghantaa-marathi-movie-review



  • Movie : Ghantaa (2016) | घंटा
  • Producor : Vinay Waman Ganu
  • Director : Shailesh Shankar Kale
  • Studio : Arbhaat Films, Kharapoos Films
  • StarCast : Aroh Velankar, Amey wagh, Saksham kulkarni, Shivani Surve, Anuja Sathe, Kishor Kadam, Pushkar Shrotri, Viju Khote, Murli Sharma, Bhau Kadam, Kanchan Pagare, Vijay kadam, Ganesh Mayekar, Mayur Khandge
  • DOP : Siddhartha More
  • Genre : Thriller, Comedy
  • Release Date : 14 October

 

Ghantaa Marathi Movie Review

प्रेक्षकांच्या आवडीचा आणि खास करुन तरुणांच्या आवडीचा विषय असला की तो चित्रपट हिट होणार याची खात्री अनेकांना असते. असाच तरुणांचा, तरुणांसाठी आणि तरुणांकडून तयार करण्यात आलेला मराठी चित्रपट ‘घंटा’ Ghantaa आज प्रदर्शित झाला आहे.  या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून, टिझरपासून प्रेक्षकांची चित्रपटाविषयी उत्सुकता वाढत गेली आहे.

ghanta-marathi-movie




Ghantaa Marathi Movie Mp3 Songs Free Download

दिग्दर्शक शैलेश काळे यांचा हा पहिलाच चित्रपट. यांनी त्यांच्या या पहिल्या चित्रपटात तीन दोस्तांची गोष्ट दाखवली आहे. अर्थात चित्रपट तरुणांचा असेल तर दोस्ती तर पहिले आलीच पाहिजे.  ‘घंटा’ ही गोष्ट फिरते तीन मित्र राज (अमेय वाघ), अंगद (आरोह वेलणकर), उमेश (सक्षम कुलकर्णी) यांच्या भोवती आणि त्यांच्या जुगाड भोवती.

अंगद हा डबिंग करत असतो आणि एका नावाजलेल्या आणि चांगल्या डबिंगच्या शोधात तो असतो, राजला मॉडेलिंग एजन्सी चालू करायची असते आणि उमेशला स्वत:ची वेबसाईट सुरु करायची असते. पण मुंबईत राहणा-या या तीन मित्रांना त्यांच्या इच्छा-आकांशा पूर्ण करण्यासाठी स्ट्रगल आणि जुगाड करावा लागतो.

याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉंईट येतो ज्यामुळे त्यांना जुगाड करायची वेळ येते.  एका क्रिकेट मॅचमध्ये हे तिघे एका व्यक्तीसोबत क्रिकेटच्या हार-जीत वर सौदा करतात, मात्र पहिले कितीही यश मिळाले तरी नंतर मात्र अपयश त्यांच्या पदरी पडतं. त्यामुळे सौद्यात ठरलेली रक्कम काही करुन देणे भाग पडते.

यावेळी सुरु होतो या त्रिकुटांचा जुगाड. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे या दरम्यान हिरे लपवलेलं पार्सल एका चुकीमुळे गहाळ होते. सट्टा खेळणा-या आणि हि-यांच्या शोधात असणा-या गॅंगमध्ये हे तिघे अडकल्यामुळे त्यांची वाजते ‘घंटा’.  पण हिरे कोणाचे असतात आणि या त्रिकुटांच्या इच्छा अखेर पूर्ण होतात का या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी‘घंटा’ पाहा.

‘घंटा’ चित्रपटाची गोष्ट गोंधळून टाकणारी आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर,टिझर आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांचा वाढलेला अतिउत्साह चित्रपट पाहिल्यावर कमी होऊ शकतो किंवा प्रेक्षकांची निराशा होऊ शकते.

दिग्दर्शक नवीनच असल्यामुळे काही गोष्टी कमी-जास्त चालू शकतात, पण नवीन दिग्दर्शक असल्यामुळे एक नवीन अँगल पाहायला मिळतो.

या चित्रपटाला बॉलिवूड मसाला दिल्यासारखं वाटतं आणि या ठिकाणी एका बॉलिवूड मसालाविषयी उदाहरण घ्यायचे झालेच तर तो हिंदी चित्रपट असेल ‘देली बेली’.

सिनेमॅटोग्राफीमध्ये नाविन्य नाही आणि चित्रपट पाहताना एका क्षणाला कंटाळा पण येऊ शकतो. प्रत्येक चित्रपटातील आणखी एक विशेष गोष्ट असते ते म्हणजे चित्रपटातील गाणं. या चित्रपटातील ‘घंटा’चं टायटल ट्रॅक हेच गाणं सगळीकडे वाजतंय.

हा तरुणांचा जरी सिनेमा असला तरी तरुणांनाच कंटाळा येऊन कसं चालेल? तरी देखील एक ट्राय म्हणून ‘घंटा’ पाहायचा असेल तर नक्की पाहा.

‘घंटा’ चित्रपटाचं रॉक टायटल ट्रॅक नक्की ऐका!-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here