महाराष्ट्राचे तमाम प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते तो क्षण आता आला आहे… अमृता आणि अक्षय लग्नबंधनामध्ये लवकरच अडकणार आहेत… अक्षयने कियाराला घटस्फोट दिला असून अक्षयने अमृताकडे एक शेवटची संधी मागितली आणि अमृताने ती संधी अक्षयला दिली… माईबरोबरच घरातील इतरांनीदेखील अक्षय आणि अमृतच्या लग्नास समंती दिली… आणि आता त्यांचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडणार आहे. सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये अक्षयच्या मागे अमृता खंबीरपणे उभी होती, त्याच्या प्रत्येक निर्णयात अमृताने अक्षयला पाठिंबा दिला, अक्षयला अमृताची मिळालेली ही साथ आता अशीच कायम रहाणार आहे.

आता खर्‍या अर्थाने अक्षयला अमृताची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे… अमृता यावेळी कोणताही संकोच मनामध्ये न बाळगता घाडगेंची सून म्हणून माप ओलांडणार आहे… पण, हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडेल ? की मनोहर या सुखाच्या क्षणामध्ये मिठाचा खडा टाकेल, हे लवकरच कळेल… घाडगे सदनमध्ये अमृतासोबतच अजून एक गृहप्रवेश होणार आहे… आता हा गृह प्रवेश कोणाचा होणार आहे ? ती व्यक्ति कोण आहे ? तिच्या घाडगे सदना मध्ये येण्याने अक्षय आणि अमृताच्या आयुष्याला कुठले नवे वळण मिळेल ? हे नक्की बघा…

अनंतची बायको म्हणून घाडगे सदनमध्ये चित्राचा देखील गृहप्रवेश होणार आहे… चित्राची भूमिका सोनल पवार साकारणार आहे… बघूया पुढे घडणार घाडगे & सून मध्ये सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…