Colours मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयला समजले आहे. कुठेतरी अक्षयला कियारासाठी अमृताला सोडल्याचे दु:ख जाणवू लागले आहे. परंतु हे तो अमृताला सांगू शकत नाहीये… कियाराने आपल्याशी इतक मोठ खोट बोलल्याचे अक्षयला सहन होत नाहीये… तो पूर्णपणे खचून गेला आहे. अक्षयच्या वागण्यात झालेला बदल, त्याची चिडचिड, त्याचा मनस्ताप सगळ अमृताला दिसत आहे पण ती त्याला मदत करू शकत नाही कारण त्याच्या अश्या वागण्यामागचे कारण तिला अजून कळाले नाहीये… हे सगळे घडत असतानाच अमृता आणि अक्षयची मैत्रीण त्यांना त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावते तेंव्हा अनाहूतपणे अक्षय आणि अमृता एकमेकांच्या जवळ येतात …माईना हे कळाले आहे अक्षय आणि अमृता तिथे एकत्र आहेत, आता याचा यामध्ये माई कोणाला दोषी ठरवणार अमृता कि अक्षय ? अमृता या परिस्थितीला कसे सांभाळून घेईल ? या घटनेने दोघांच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाची भावना येणार का ? अक्षय आणि अमृता यांच्या नात्याचा बंध अजून दृढ होणार का ? अक्षय अमृताला कियाराचे सत्य सांगणार का ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८,३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
अक्षयला कियाराच्या वागण्याने खूप एकट वाटत आहे … आणि त्याला खात्री आहे कि, अमृताच त्याला मदत करू शकते. अक्षय अमृताला हे पटवून देतो अमृताच एकमेव व्यक्ती आहे जी त्याला या सगळ्या गुंत्या मधून बाहेर काढू शकते, तीच आहे जी या सगळ्या अडचणी मधून अक्षयला धीर देऊ शकते, मार्ग दाखवू शकते. अमृताला अक्षयचे हे वागणे पटत नसून ती अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करते कि, आता त्याची बायको कियारा आहे आणि हे सगळं घडत असतानाच अक्षय आणि अमृताला माई एकत्र बघतात. दुसरीकडे वसुधा घाडगे कुटुंबाला पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. या माग तिचा काय हेतू आहे हे कुणालाच माहिती नाही.
हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८,३० वा. फक्त कलर्स मराठीवर.