छंद प्रामाणिक पणे जोपासता कधी यशाची वाट घावेल, हे काही सांगता येत नाही. ६८ वर्षांच्या एका आज्जीचा चा’कु सू’री निशाणा लावण्याचा छंद, कुणालाचं वाटलं नव्हतं, की वर्ल्ड पर्यंत घेऊन जाईल म्हणून.
गेलिना चूविना या ६८ वर्षांच्या आज्जीबाई च्या एका प्रेरणादायी प्रवासाची ही गोष्ट आहे. गेलिना चूविना ही आज्जी रशियाच्या एका छोट्याश्या खेड्यातील भाग असणाऱ्या सोसोवा इथे राहते. चा’कू !… सू’री चालवणं हा तिचा छंद आहे. हा छंद ती इतक्या प्रमाणिक पणे जोपासते, की ती जागतिक स्पर्धेमध्ये तब्बल आठ वेळा आज्जी विजेती ठरलेली आहे. एवढंच नव्हे, तर ती नॅशनल, यूरोपीयन तसेच वर्ल्ड लेवल ची चॅम्पियन सुद्धा झालेली आहे.
छंद, टॅलेंट आणि पुढं जाऊन आयुष्याच्या ओळखीत बदलायला सुरुवात झाली, ती म्हणजे २००७.
गेलीना चुविना ला २००७ मध्ये असं वाटलं की ती चांगला नेम मारू शकते. ती तेव्हा एक लोकल पूल मध्ये काम करत होती. एकदा कामाच्या वेळी दोन लोकं जात होती, आणि त्यांची नाइफ थ्रोइंग विषयी चर्चा चालू होती. गेलीना ने त्या दोघांशी संवाद साधला आणि सर्व माहिती विचारली. त्यावेळी तिला स्पर्धे विषयी कळालं. त्या स्पर्धेसाठी तिने सर्वात आधी रजिस्ट्रेशन केले.
दीड महिन्या नंतर गृहनगर मध्ये चा’कू फेकण्याची स्पर्धा झाली. त्यामधील स्पर्धेत 50 असे लोकं असे होते की काही आर्मी जवान, प्रोफेशनल नावी थ्रोवक आणि त्याचसोबत काही नवीन लोक ही होते. सर्व आश्चर्य चकित तेव्हा झाले जेव्हा गेलीना ने प्रथम क्रमांक मिळवला. कुणाचाच आनंद गगनात मावत नव्हता.
पण काही लोकांनी तिच्या उल्लेखनीय कामगिरीला फक्त एक गैरसमज समजला. पण यावर गेलीना ने काही उत्तर न देता 2007 मध्ये तिने मॉस्को मध्ये झालेल्या नॅशनल नाइफ थ्रोइंग स्पर्धेत भाग घेतला व त्या स्पर्धेत गेलीना ला देशातली सर्वात बेस्ट नाइफ थ्रोइंग म्हणून घोषित केले. या नंतर तिने मागे वळून पाहिलेचं नाही.
पुढील वर्षी म्हणजे २००८ साली त्यांनी बेस्ट नाइफ थ्रोइंग स्पर्धेत भाग घेतला. इथे एका 68 वयाच्या आजी पुढे 36 वर्षे चा जगातला सर्वकृष्ठ नाइफ थ्रोइंग करणारा तरुण होता.
गेलीना ने या सामन्यात आपले सर्वस्व पणाला लावले. आणि ही स्पर्धा जिंकली. लोकं नंतर त्यांना ‘बाबा गाल्या’ म्हणून पुकारू लागले. बाबा म्हणजे आजी गाल्या म्हणजे देवाची एक तरंग.
या आज्जीबाई यांनी आत्तापर्यंत 50 मेडल जिंकले आहेत.
गेलीना ने 2013 मध्ये युरोपियन नाइफ अँड एक्स थ्रोइंग चॅम्पियनशिप जिंकली. गेलीना ला कित्येक देशात नॅशनल प्लेअर म्हणून ओळखले जात. गेलीना ने टेलिव्हिजन न्युज आणि शोज मधून खूप ओळख बनवली आहे.