• On a fine day, few marvelous people gathered and decided to experiment on Acapella.
    This Ganesh Utsav, Cheer It Loud to the brand new Acapella
    ganpati Song.
    One humble approach towards our beloved bappa, this Ganesh Chaturthi let’s introspect the beauty of God.
  • Produced By :- Prasanna Babasaheb Tanawade
  • Music Director :- Praful Karlekar
  • Lyrics Writer :- Mandar Cholkar
  • Singer :- Adarsh Shinde

मंदार चोळकर – प्रफुल्ल कार्लेकर यांच्या जोडगोळीचं “हे गजेश्वर गणपती” गाणं

नुकताच प्रदर्शित झालेल्या हृदयांतर या सिनेमाची गाणी  मंदार चोळकरने लिहिली तर प्रफुल्ल कार्लेकर यांनी संगीतबद्ध केली. या सिनेमातून आपण त्यांच्याजोडगोळीची कमाल पहिली आहे. प्रफुल्ल- मंदारची ही जोडगोळी आपल्यासाठी एक नवीन गाणं घेऊन आले आहे. सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरुझाली आहे. गणपतीच्या स्वागताची तयारी अगदी जोरदार करण्यात आली आहे. गणपतीच्या स्वागतासाठी ‘अॅकापेला’ फर्ममध्ये असलेलं “हे गजेश्वर गणपती”  गाणंनुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.  हे गाणं मंदारने लिहिलं असून प्रफुल्ल यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘अॅकापेला’ हा संगीतचा एक प्रकार असूनयामध्ये वाद्यांच्याऐवजी नैसर्गिक आवाजाचा वापर केला जातो.

महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे, त्याचबरोबर स्वप्नील गोडबोले, कौशिक देशपांडे, आरोही म्हात्रे, प्रगती जोशी, उमेश जोशी, स्वरामराठे, रोंकिणी गुप्ता, अदिती प्रभुदेसाई या गायकांचा देखील सहभाग आहे. सुनील केदार यांनी या गाण्याचं छायाचित्रण केलं आहे. मंदार आणि प्रफुल्लच्या इतरगाण्यांप्रमाणेच ‘हे गजेश्वर गणपती’ गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंका नाही.