आजकल प्रत्येक घराच्या किचनमध्ये आवर्जुन आढळणारी वस्तु म्हणजे फ्रिज. त्यामुळे फ्रिजचा वापर हा सरासर केला जातो. फळ, भाज्या, उरलेलं अन्न हे थेट फ्रिजमध्येच ठेवलं जातं. आपल्याकडे जास्तीस्त जास्त जण हे संध्याकाळच्या वेळी राहिलेल्या पोळ्यांची कणीक ही फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यापासून पुन्हा सकाळी पोळ्या,पराठे करतात.मात्र रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमुळे आपल्याला नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहीत आहे का? फ्रीजमधील या कणिकमुळे आपल्याला आरोग्याला नुकसान होऊ शकते.

अनेक स्त्रिया सकाळच्या वेळात घाईघाईत घरातलं सगळं आवरुन ऑफिसला जातात. या धावपळीमध्ये थोडं काम हलकं व्हावं यासाठी स्त्रिया सकाळी डबा करताना लागणारी भाजी रात्रीच निवडून किंवा चिरुन ठेवतात. तसंच बऱ्याचदा पोळ्यांसाठी लागणारी कणिकदेखील रात्रीच भिजवून फ्रीजमध्ये ठेवतात. कणिक आदल्या दिवशी भिजवल्यामुळे काम हलकं होतं. मात्र फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक शरीरासाठी घातक असते.

फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या खाल्ल्यामुळे त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो. फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेली कणिक दुसऱ्या दिवशी थोडीशी काळसर रंगाची दिसायला लागते. त्यामुळे शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो.

शास्त्रामध्ये शिळ्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या खाऊ नयेत असा उल्लेख करण्यात आला आहे. शास्त्रानुसार शिळे पीठ हे एका पिंडासारखे असून त्यामुळे नकारात्मक शक्ती घरात येतात.त्याशिवाय शिळे भोजन हे भुताचे भोजन असून ते खाण्याने भूताचा प्रभाव वाढतो.ज्या परिवारात शिळे अन्न खाल्ले जाते त्या घरात कोणीना कोणी सतत आजारी असते.त्यामुळे चुकूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्या तयार करु नयेत.

फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,परोठा हे कडक होतात. या कडक पोळ्या खाल्याने पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो अशा पोळ्या खाणं टाळा.

भिजवलेलं पीठ बराच वेळ तसं ठेवल्यामुळे त्यात अंबविण्याची प्रक्रिया सुरु झाली असते. भिजवलेल्या पीठामध्ये काही बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायन तयार होतात. त्यामुळे पोळ्या लवकर खराब होतात.

फ्रीजमधील पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,पराठे अंबविण्यास लवकर सुरवात होते. यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टे रीया आणि हानिकारक रसायन तयार होतात.त्यामुळे मनुष्याच्या स्वास्थ्याला नुकसान पोचते.त्यामुळे यापासून तयार केलेल्या पोळ्या शरीराला त्रासदायक होते.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.