मित्रांनो!, ज्ञानी, अनुभवी, जाणकार आणि तज्ञ व्यक्तींचे एक वाक्य अनेकदा आपल्या कानांवर पडले असेलच की, या जगात कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल त्यात प्रत्यक्ष काम करून, अनुभव घेऊन जर कुशल आणि निपुण झालात आणि नेहमी यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही या आयुष्यात तुम्ही एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून नक्कीच ओळखले जाल.

आपल्या सभोवतालच्या सगळ्याच क्षेत्रात इमानदारीने कष्ट करून पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत, फक्त आपल्याला ते मार्ग माहीत हवेत आणि त्या मार्गाने तो कमावता आला पाहिजे. आता उदाहरण द्यायचे झाले तुम्ही जर मी हॉटेलमध्ये काम करतो म्हणालात तर, नातेवाईक मंडळी आणि समाजातील लोक तुमच्यावर हसतील, तुमची टर उडवतील. मात्र याच क्षेत्रातील काही लोकांची कमाई बघितली तर हे हसणारे सर्वजण आश्चर्यचकित होतील.

फक्त त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती गुणवत्ता आणि अन्य काही कौशल्ये असायला हवीत. प्रत्येक क्षेत्रात एक सर्वोच्च स्थान असतेच. वेटरांच्या दुनियेतही एक सर्वोच्च स्थान आहे. त्याबद्दल सांगायचे झाले तर, आपण फाईव्ह स्टार हॉटेलचेच उदाहरण घेऊन पाहू. या हॉटेलात काम करणाऱ्या वेटर्सची दार महिन्याचा नुसता पगार जर तुम्ही जाणून घेतला तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होऊन जाल…

आता आपण मुंबईतील सुप्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल ताजमहालचेच उदाहरण पाहू. ताज हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध हॉटेल आहे. केवळ भारतात नाही तर जगभरात त्याची ख्याती आहे. देशविदेशातील कित्येक व्यक्ती मुंबईला आल्यानंतर या ताज हॉटेलमध्येच थांबतात, जेवतात आणि आनंद घेतात. याला तुम्ही अतिश्रीमंत लोकांचे हॉटेल असेही म्हणू शकता.

इथे मिळणारी प्रत्येक गोष्ट सामान्य हॉटेलपेक्षा कित्येक पटीने महाग असते. श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे द्योतक म्हणजेच ताज फाईव्ह स्टार हॉटेल ! इथे येणारे लोक जर एका दिवसासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार असतात, तर इथे काम करणाऱ्या लोकांना पगार सुद्धा तसाच चांगला घसघशीत मिळत असेलच की. आणि प्रत्यक्षात आहेही तसेच !

मित्रांनो, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्समध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसे की त्यांचे शिक्षण, त्यांचे संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, त्यांचा स्वभाव, इत्यादि. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्सना अगोदर कित्येक मुलाखती द्याव्या लागतात.

त्यानंतरच त्यांची निवड होऊन त्यांना फाईव्ह स्टार सारख्या आलिशान हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळते. इथे काम करणाऱ्या वेटर्सला १ लाख ३० हजार रुपयांपासून १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळतो. खूप मोठ्या मोठ्या डिग्रीज घेऊनही कॉर्पोरेट मधील लोकांना सुद्धा एवढी सॅलरी मिळत नाही. त्यामुळे वेटर्सची नोकरी सुद्धा काय कमी नाही.