Urvashi Rautela

पैसे असतील तर काहीच कमी नसतं; पण पैसा नसेल तर जगणं अवघड होतं. हे सध्याचं चित्र आहे. गरीब पोटासाठी वणवण भटकतोय. अश्यात श्रीमंत व्यक्ती गरीबाला हीन लेखतोय हे मात्र चुकीचं आहे.

एका अभिनेत्रीने एक वक्तव केलं आहे. जे तुम्ही वाचाल तर विचारात पडाल. काय आहे ? नेमकं हे प्रकरण ? चला तर मग जाणून घेऊयात.

कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सतत चर्चेत अनेक नावांपैकी एक उर्वशी रौतेला. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

मात्र यावेळी ती कुठल्याही पोस्टमुळे नव्हे तर आपल्या ड्रीम बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेल्या काही काळात लग्न बंधनात अडकले.

या पार्श्वभूमीवर उर्वशी कधी लग्न करणार? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिने देखील एक चकित करणार उत्तर देत चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.

यापूर्वी उर्वशी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि संगीतकार गुरु रंधावासोबत रिलेशनशिपमध्ये होती अशा चर्चा होत्या. तिचे या दोघांसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

परंतु तिने या सेलिब्रिटींसोबत असलेल्या नात्याबाबत कधीही खुलासा केला नाही. शिवाय स्वत:च्या एक्स बॉयफ्रेंडचं नावही कधी सांगितलेलं नाही.

अश्यात मी जर लग्न केलं तर माझा होणारा नवरा हा श्रीमंत असावा. त्याच्याकडे गाडी बंगला हवा. कोणत्याही गरिबासोबत मी कधीच लग्न करू शकणार नाही. उर्वशीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नावर भाष्य केलं. ती म्हणाली, “प्रेम या संकल्पनेवर माझा खुप विश्वास आहे. लवकरच माझा ड्रीमबॉय माझ्या समोर येईल अशी मला खात्री आहे. यापूर्वी मी एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही कारणांमुळे आमचं नात दिर्घ काळ टिकलं नाही. पण त्याने मला एखाद्या राजकुमारीसारखी वागणूक दिली होती. माझ्या सर्व इच्छा तो पूर्ण करायचा. मला अशाच एखाद्या श्रीमंत तरुणासोबत लग्न करायचं आहे. त्या व्यक्तीची मी वाट बघतेय. तो श्रीमंत व्यक्ती समोर येताच मी त्याच्यासोबत लग्न करेन.”

असं अभिनेत्री उर्वशीचं मत सध्या खूप व्हायरल होत आहे.

आता तिच्या मताशी आपण कितपत सहमत आहात ? हे आपण वरील माहितीच्या आधारे कॉमेंट करून सांगा. कारण तिचं मत वादग्रस्त आहे.

आयुष्यात कधीच कुणीच कुणाची लायकी काढू नये..