ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

 

Episode 15 March Lokshahir Nandesh Umap IN “Sargam”

१५ मार्च चा एपिसोड लोकशाहीर नंदेश उमपांच्या आवाजाने दुमदुमणार, लोकगीतांची मैफल झी युवाच्या “सरगम” मध्ये सजणार …!

दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या घरात जी लोकसंगीताची गायकी रुजवली आणि जोपासली, तीच त्यांच्या पश्चात नंदेश उमप सांभाळत  आहेत . लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश उमप रंगमंचावर गायला उभे  राहिले .  तेव्हापासून जवळजवळ पंचवीस-तीस वर्षं नंदेशत्यांच्याबरोबर, त्यांच्या साथसंगतीने गात होते , घडत होते . लोकसंगीताची परंपरा उमप  घराण्याच्या आवाजाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात दुमदुमुन निघाली  . लोकसंगीताचा हाच वारसा झी युवा, “सरगम “या कार्यक्रमाद्वारे एका नव्या रूपात या बुधवारी १५ मार्च आणि गुरुवारी १६ मार्च ला रात्री ९ वाजता महाराष्ट्रासमोर घेऊनयेत आहे.

 

दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमपांबरोबर lokshahir vitthal umap गाण्याच्या अनुभवामुळे  ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगततुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेश यांनी  सहीसही उचलली. घराणंच लोकसंगीतकारांचं असल्यामुळे त्यासाठीलागणारा खुल्या आवाजाचा बाज नंदेश यांच्याकडे जन्मतःच होता. पण शाहिरांच्या म्हणजे विठ्ठल उमपांच्या अस्सल गावरान गायकीचा वारसा त्यांना मिळाला आणित्याची गायकी उजळून निघाली. लोकशाहिरांचा ४३ मीटरचा पायघोळ अंगरखा अंगावर चढवत, थेट त्यांच्याच थाटात ‘द्रोपदीचं मन पाकुळलं’ म्हणत रंगभूमीवर उभे राहिले . मात्र वडिलांबरोबर सावलीसारखं वावरतानाही, नंदेश यांनी  स्वतःचं स्वातंत्र्य जपलं. वेगळेपण अधोरखित केलं. त्याचमुळे नाटक-सिनेमांपासून ते दूरदर्शनमालिकांपर्यंत त्याने आपल्या गाण्याचा ठसा उमटवला आहे.

झी युवावरील “सरगम” या कार्यक्रमात नंदेश उमप त्यांनी गायलेली अनेक उत्तमोत्तम गाणी गाणार आहेत जी प्रेक्षकांना भारावून सोडतील मंत्रमुग्ध करतील . त्यांच्या सरगमच्या दोन भागात  ते प्रेक्षकांसमोर . गणाला , सुबरान , मळ्याच्या मळ्या मंदी , केसरीया बालम , माझ्या आईचा गोंधळ , दार उघड बया , अवचितलापरिमालू , मल्हारवारी , माझ्या कान्हडया मल्हारी , माझी मैना गावांकडे राहिली  , दमादम मस्त कलंदर हि आणि अशी अनेक गाणी सादर करणार आहेत.

“सरगम” हा कार्यक्रम नावाप्रमाणेच अतिशय संगीतमय आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवन यांच्या दैवी आवाजाने झाली. त्यांना या कार्यक्रमातमहेश काळे यांनी साथ दिली. त्याच प्रमाणे या कार्यक्रमात सिद्धार्थ महादेवन, शिवम महादेवन, श्रीनिधी घटाटे ह्यांनीही आपली कला सादर केली. सरगम च्या दुसऱ्याएपिसोड मध्ये आनंद शिंदे, आदर्श शिंदे हि बाप लेकाची जोडी त्यांच्या बुलंद आवाजाने एक वेगळाच माहोल बनवला .  या एपिसोड मध्ये आनंद शिंदेंचं नवीन पोपट हा, आवाज वाढवं डीजे, चिमणी उडाली भुर अशी तालावर नाचवणारी गाणी झालीच  पण सुन्या सुन्या मैफलीत माझ्या हे अनप्लगड,  तर देवा तुझ्या गाभाऱ्याला अशीमनाला भिडणारी गाणी सुद्धा  लोकांना आवडली . त्याचप्रमाणे त्यांनी गायलेल्या  गझल आणि कव्वाली सुद्धा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . कविता निकम या गायिकेने याकार्यक्रमात साथ दिली.

सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .”सरगम” या कार्यक्रमाच्यासूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे  शीर्षक गीतशंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणिगुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here