आर. आर. पाटील ( तात्या ) पो’लि’स दलातील संत माणूस म्हंटलं तरी वावग ठरणार नाही. खर तर पो’लि’स दलाचे ब्रिदवाक्य असलेल्या “सदरक्षणालय खलनिग्रहानलय “या वाक्याप्रमाणे जवळपास ३२ वर्षे निष्कलंक ,विनम्र,चारित्र्यवान व प्रामाणिकपणे सेवा करत आर. आर ( तात्यांनी ) पो’लि’स खात्याची उंची वाढविली. १९९५ मध्ये मी शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वात शिरोळ तालुक्यांतील विविध प्रश्नावर आंदोलन करत असत त्यावेळेस आर. आर. (तात्या ) जयसिंगपूर पो’लि’स ठाण्यात सहाय्यक पो’लि’स निरीक्षक या पदावर कार्यरत होते.

मी आं’दो’लन केले त्यावेळेस जयसिंगपूर स्टॅंडजवळ पो’लि’सांनी आम्हाला बे’द’म मा’र’हाण करण्यास सुरवात केली. तात्यांनी ही घ’ट’ना पाहिल्यानंतर ते थेट पळत येऊन मी खाली प’ड’लेलो असताना ते माझ्या अं’गावर पडले व त्या पो’लि’सांच्या तावडीतून मला सोडविले व त्यावेळेस त्यांनी पो’लि’सांना एक वाक्य बोलून गेले की “आरे ती माणस समाजाच्या विधायक कार्यासाठी आं’दो’ल’न करत आहेत”. आपले काम कायदा व सुव्यवस्था राखणे आहे म्हणजे लाठीचार्ज करणे नाही.

याच तात्याच्या वाक्यातून व आम्हा आं’दो’ल’कांना दिलेल्या वागणुकीतून आमची व तात्यांची मैत्री घट्ट झाली. १९९५ पासून आज २०२१ पर्यंत जवळपास २६ वर्षाच्या या प्रवासामध्ये तात्या मला कधी पो’लि’स अधिकारी वाटलेच नाहीत. त्यानंतर अनेक आं’दो’लने व मो’र्चेमधून तात्यांनी आमच्या चळवळीला बळ देत मार्गदर्शन केले. पो’लि’स खात्याकडून ज्यावेळेस एखाद्या आमच्या मोर्चाची जबाबदारी तात्यांच्याकडे सोपविले जायची त्यावेळेस तात्या त्या मोर्चेतील मोर्चेकरांना न विसरता पाणी , केळी व अल्पोपहारची व्यवस्था करत असत.

ज्यावेळी तात्यांचे सख्खे भाऊ आर. आर (आबा ) राज्याचे उपमुख्यमंत्री ,ग्रहमंत्री अशा महत्त्वाच्या पदावर काम करत होते त्यावेळेस या अवलियाने आपला कोणताही बडेजाव व रुबाब न करता पो’लि’स दलातील साईड पोस्टवर काम केले. गरीबीची चटके सोसलेल्या तात्यांनी पो’लि’स अधिकारी म्हणून आपल्या धार्मिक व अध्यात्मिक स्वभावामुळे परिस्थीतीमुळे घडलेल्या अनेक गु’न्हेगारी पार्श्वभुमिच्या अनेक वाल्यांना वाल्मिकी केली. तात्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारकडून दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.

तात्या आज आपल्या ३२ वर्षाच्या खाकी वर्दीच्या सेवेतून निवृत्त झाले मात्र ज्या आईने रक्ताचे पाणी व हाडाची काडे करून केलेल्या कष्टातून तात्यांना घ’डविले त्या आईस आज सकाळी सॅल्यूट करत त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली ही संस्काराची शिदोरी त्यांच्या आजवरच्या कामाच्या पोहचपावती आहे.तात्यांच्या पुढील कार्यास आमच्या स्वाभिमानी परिवाराकडून मनःपुर्वक शुभेच्छा !