‘दोन स्पेशल’ला मानाचे 5 पुरस्कार

Don Special Wins 5 Awards

 

झी नाट्यगौरव…. गौरव रंगभूमीचा…. रंगभूमीला अमरत्व प्रदान करणाऱ्या नाट्यवेड्या कलाकारांचा.

 

ज्यांनी रंगभूमी जपली… फुलवली…. जिवंत ठेवली आणि मायबाप रसिकजणांना कलेचं भरभरुन दान दिलं त्या नाट्यपंढरीतल्या वारकऱ्यांचा हा गौरव सोहळा.

 

या वर्षीच्या झी गौरव पुरस्कारांमध्ये बाजी मारली ती ‘दोन स्पेशल’ या नाटकाने… सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,  सर्वोत्कृष्ट नाटक यासह तब्बल 5 मानाचे पुरस्कार ‘दोन स्पेशल’ नाटकाला मिळाले.

don-special.jpg

व्यावसायिक रंगभूमीवरची  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली अमृता सुभाष. ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकासाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

 

प्रायोगिक रंगभूमीसाठी देण्यात येणारा सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार इला भाटे यांना देण्यात आला. पै पैशांची गोष्ट या नाटकातील भूमिकेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.

 

या सोहळ्यात विशेष लक्ष्यवेधी नाट्यकृती या पुरस्काराने हा शेखर खोसला कोण आहे या नाटकाला सन्मानित करण्यात आलं.

 

यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले रामकृष्ण नाईक… दी दोवा हिंदू असोशिएन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाट्यकलेची अविरत सेवा करणाऱ्या रामकृष्ण नाईक यांचा हा सन्मानसोहळा टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन निघाला.

 

नाट्यविश्वातल्या अशा दिग्गजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि नव्या पिढीला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा हा सोहळा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here