एक मालिका सध्या झी युवा वर खूप गाजतेय. वेगवेगळ्या पद्धतीने त्या मालिकेत काम चालू आहे. म्हणजे विषय खूप रोमँटिक आहे. ज्यात प्रेम आहे. तर त्या मालिकेचं नाव म्हणजे डॉक्टर डॉन. आता त्या मालिकेत एक वेगळंच वळण आलेलं आहे. आता ते म्हणजे नेमकं काय ? तर चला मग जाणून घेऊयात प्रकरण.

डॉक्टर डॉन मालिकेत दररोज नवनवीन गोष्टी घडत असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी डॉक्टर डॉनची संपूर्ण टीम सतत नवीन गोष्टीच्या शोधात असते. आता मोनिका आणि देवा यांच्यात तिसरी व्यक्ती येणार आहे. आता ती तिसरी व्यक्ती खूप ओळखीची आहे.

म्हणजे झी मराठी च्याच एका शो मध्ये हसवताना आपण कायम पाहत असतो. तो कलाकार कोण ? तेच जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता लागलेली असेल, तर खालील लेखात जाणून घ्या. झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे.

म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.

आता ही दुसरी व्यक्ती शूटिंगच्या सेटवर येऊन पोहोचली आहे पण ती कोण आहे हे श्वेताने हा फोटो सोशल मीडियावर टाकून प्रेक्षकांना ओळखायला सांगितलं आहे. आता हा नवीन कलाकार कोण आहे आणि मालिकेत हि नवीन व्यक्तिरेखा काय वळण घेऊन येणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

याच दरम्यान, अनेकांनी श्वेताच्या पोस्टवर कमेन्ट करून सागर कारंडे याचं नाव घेतलं. तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला सांगा. होय, सागर कारंडे हे त्या मालिकेत काम करत आहेत. आता इथून पुढे सागर कारंडे चा अभिनय आपल्याला इथेही पाहायला मिळणार आहे. सागर आणि डॉक्टर डॉन च्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.