देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांचा झी युवावरील लोकप्रिय कार्यक्रम डॉक्टर डॉन प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मोनिका आणि देवा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावतेय. पण त्याचसोबत देवाचं आपल्या मुलीसोबत असलेलं नातं आणि कबीरशी असलेली त्याची मैत्रीही प्रसिद्ध आहे.

१३ जुलै पासून डॉक्टर डॉनचे नवीन भाग रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेत कबीरची भूमिका करणारा अभिनेता, अनुराग वरळीकर याचा चेहरा तमाम प्रेक्षकांना ओळखीचा वाटतो. तुम्हाला माहिती आहे का अनुराग लहानपणापासून अभिनय क्षेत्रात आहे. तो एक बालकलाकार म्हणून अतिशय लोकप्रिय होता. बाल कलाकार म्हणून अनुरागने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलंय. देवकी या सुपरहिट चित्रपटात तसंच दे धमाल या लोकप्रिय मालिकेत देखील अनुरागने प्रमुख भूमिका निभावली होती. त्याचे बालपणीचे काही फोटोज अनुरागने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.