धनगर समाजाला आरक्षण मिळण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच वातावरण टाईट करणारे , महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवत आक्रमक नेतृत्व ,बहुजन समाजाचा लोकनेता गोपीचंद पडळकर हे आता अभिनेता म्हणून लोकांसमोर येणार आहेत.
धुमस चित्रपटाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत नुकताच धुमस ह्या चित्रपट ट्रेलर लाँच झाला.

Gopichand padalkar Director

 

 

जबरदस्त ऍक्शन, आकर्षक संगीत, दाक्षिणात्य वातावरण डोळ्यासमोर उभे राहिले असा धुमसचा ट्रेलर आहे. उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर राजकीय पटलावर जशी फाईट देऊन वातावरण टाइट करतात तसच चित्रपटा तसुद्धा फाईट करताना दिसणार आहेत .गोपीचंद पडळकर प्रथमच नायक म्हणून चित्रपाटाच्या माध्यमातून समोर येत आहेत .तर साक्षी चौधरी ही प्रमुक नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे .

 

शिवाजी दोलताडे ह्याच्या दिग्दर्शन असलेला धुमसला पी .शंकराम यांनी संगीतबद्ध केलं3 आहे . ‘मन भरून आलया’ हे रोमँटिक गाणं सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि सोनू निगम चित्रपटातील इतर गाणी वैशाली सामंत ,आदर्श शिंदे स्वरबध्द केले आहे . चित्रपटाचं कथानक व्यवस्थेने दाबून ठेवलेल्यांची व्यथा , गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देणे आणि गुलामगिरीतून मुक्त होणे ह्या विषयाशी संबंधित आहे .

 

चित्रपटात चला हवा येउद्या फेम भारत गणेशपुरे ,सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता कमलाकर सातपुते ,कृतिका गायकवाड ,साक्षी चौधरी ,उत्तमराव जानकर ,विशाल निकम इ.कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत .साऊथ स्टाईल मराठी प्रथम चित्रपट हे चित्रपटाचे वैशिष्ट्य.

 

गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सम्पूर्ण महाराष्ट्रभर असल्याने चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. धुमस चित्रपट अवघ्या काही दिवसात आणखी उत्सुकता वाढवेल यात शंका नाही. राजकारणात दबदबा असलेले गोपीचंद पडळकर हे धुमस चित्रपटामुळे आणखी चर्चेत आले असून धुमस चित्रपट पाहणे औत्सुकतेचे ठरेल .