Dholkichya Talawar Grand Finale winner Minashi & Pallavi

979

ढोलकीच्या तालावरमध्ये मीनाक्षी  पलक ठरली महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी जोडी !

छोट्यांच्या निरागस अदाकारींनी जिंकली अवघ्या महाराष्ट्राची मने !

महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्यशैलीला कलर्स मराठीवरील “ढोलकीच्या तालावर” या कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये नाविन्यपूर्ण ढंगात सादर करण्यात आले. अवघ्या तीनच महिन्यामध्ये या पर्वातील छोट्या अप्सरांच्या निरागस अदाकारीने आणि मोठ्या मुलींच्या दिलखेचक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली. या नव्या पर्वामध्ये १२ प्रतिभावान आणि नृत्याची जाण असणाऱ्या जोड्यांमध्ये महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी पद जिंकण्यासाठीची चुरस चांगली रंगली. शेवटच्या आठवड्यामध्ये या १२ जोड्यांमधून मीनाक्षी – पलकधनश्री – अनुष्काचिन्मयी – समृद्धीसमृद्धी – धनिष्ठा आणि ऋतुजा – ईश्वरी या पाच जोड्यांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये जाण्याचा मान पटकावला. ज्यामध्ये मुंबईची मीनाक्षी – पलक ही जोडी ठरली ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाची महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी जोडी. या विजेत्या जोडीला कलर्स मराठी तर्फे Golden Trophyतसेच ३ लाखाचा धनादेश देण्यात आलातर बाकीच्या चारही जोड्यांनी दुसरे स्थान पटकावले. महाअंतिम सोहळ्यासाठी सजलेला मंच,स्पर्धकांमधील चुरस आणि उत्तम कलाविष्कार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे २४ आणि २५ जुलै रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.  

 सोहळ्याची सुरुवात पाच जोड्यांच्या सुंदर समूह नृत्याने झाली. जी Trophy मिळविण्यासाठी तीन महिने या जोड्यांनी एकामेकांना टक्कर दिली त्या Trophy ला कार्यक्रमाचा सूत्रधार हेमंत ढोमे याने मंचावर आणले. तुतारीच्या घोषात, स्पर्धकांना टिळा लावून पारंपारिक पद्धतीने या जोड्यांना तिन्ही परीक्षकांनी शुभेच्छा दिल्या. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या वैशाली जाधव आणि मृण्मयी गोंधळेकर या विजेत्यांनी अप्रतिम लावणीने जमलेल्या प्रेक्षकांची तसेच परीक्षकांची वाहवा मिळवली. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या मागील पर्वातील परीक्षक मानसी नाईक आणि दिपाली सय्यद यांनी आपल्या नृत्यातून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि महाअंतिम सोहळ्याची शोभा देखील वाढवली. जेष्ठ नृत्यांगना शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर यांनी सादर केलेल्या नृत्याने महासोहळ्याची रंगत वाढली. या भागातील विशेष म्हणजे छोट्या आणि मोठ्या मुलींचा लाडका जितु मामा म्हणजेच जितेंद्र जोशीने देखील बम बम बोलेसुबहा होगई मामू या गाण्यांवर छोट्या अप्सरांबरोबर नृत्य सादर करून या अप्सरांना भेटच दिली. महाराष्ट्राची लाडकी सोनाली कुलकर्णी हिने तिची सुप्रसिध्द गाणी अप्सरा आली तसेच बाजीराव मस्तानी सिनेमातील पिंगा आणि दिवानी मस्तानी या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. ढोलकीच्या मंचावर महाअंतिम सोहळ्याच्या निमित्ताने “बालपण देगा देवा” मालिकेमधील आनंदी तिच्या आवडत्या अनुष्काला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी आली. आनंदीने अनुष्कासोबत एक स्टेप करण्याची इच्छा व्यक्त केलीती अनुष्काने लागलीच पूर्ण केली आणि त्या दोघी मंचावर थिरकल्या. कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा मंचावर स्वप्नील जोशीने गणेश आचार्य बरोबर एन्ट्री केली. असा हा महासोहळा नृत्यकलाकार आणि स्पर्धकांची रंगलेली चुरस यांनी रंगून गेला. 

 महाअंतिम सोहळ्यामध्ये पाच जोड्यांनी एकसे बडकर एक लावण्या सादर केल्या ज्यामधील छोट्यांची निरागस आणि गोंडस अदाकारी तसेच मोठ्यांची ठसकेबाज लावणी खरोखरच कौतुकास्पद होती. या सोहळ्यातील प्रत्येक लावणीमध्ये वेगळेपण बघायला मिळाले. सर्वच जोड्यांनी या महाअंतिम फेरीमध्ये उत्तम नृत्य सादर करण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्याची तपस्याकठीण परिश्रम यांची कसोटी लागणार होती त्यामुळे या पाचही जोड्यांना उत्तम नृत्य सादर करणे भाग होते. धनश्री आणि अनुष्काने Fantastic म्हणतोय मला या गाण्यावर लावणी सादर केली. चिन्मयी – समृद्धीने फितुरी तर मीनाक्षी – पलक यांनी राती अर्ध्या राती यावर लावणी सादर करून परीक्षकांची मने जिंकली. समृद्धी आणि धनिष्ठाने इश्काचा बाण तसेच ऋतुजा आणि ईश्वरीने तुम्हावर केली या गाण्यावर लावणी सादर केली. पाच जोड्यांनी सादर केलेल्या लावण्या या एकमेकांपेक्षा सरस आणि ठसकेबाज होत्या. पणया पाच जोड्यांमध्ये कोणती तरी एकच जोडी विजेती ठरणार हे नक्की होते त्यामुळे सगळ्या जोड्या आतुरतेने वाट पाहत होत्या कोणाला मिळणार महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होण्याचा मान. पलकच्या लै भारी अदाकारीने आणि मीनाक्षीच्या ठसकेबाज लावणीने परीक्षकांची मने जिंकली आणि पटकावला महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होण्याचा मान.

 तेंव्हा बघायला विसरू नका “ढोलकीच्या तालावर – छोट्यांची अदाकारी लै भारी” महाअंतिम सोहळा २४ आणि २५ जुलै रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.