बॉलिवूडची ड्रीम गर्ल आणि प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी यांना धर्मेंद्र खूप खूपच प्रेम करत होते, पण हेमा मालिनीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसर्‍या सुपरस्टारशी करण्याचा निर्णय घेतला होता.

दोघांच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि सर्व लोक लग्नासाठीही मद्रास येथे पोहोचले देखील होते. पण यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे हेमा मालिनीचे लग्न मोडले.

हेमा मालिनी यांनी आपल्या “बियॉन्ड द ड्रीम गर्ल” या बायोग्राफी मध्ये एका वाक्यात म्हटले आहे की धर्मेंद्र तिचे खूप प्रेम होते पण धर्मेंद्र अगोदरच विवाहित असल्यामूळे तिने आपले नाते कुटुंबातील सदस्यांपासून लपवून ठेवले होते. हेमा मालिनी यांच्या कुटुंबियांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी हेमा मालिनीला धर्मेंद्रला भेटणेही बंद केले होते.

त्यावेळी सुपरस्टार जितेंद्र सोबत हेमा मालिनी 2 चित्रपट करत होती, त्या दोघांची चांगली मैत्री होती, म्हणूनच कदाचित हेमा मालिनीच्या घरातील लोकांनी जितेंद्रशी तिचे लग्न ठरवले होते. सर्व लोक लग्नासाठी मद्रास येथे पोचले होते पण अभिनेता धर्मेंद्रला तिथे पाहून सर्वजण नाराज झाले.

बर्‍याच चर्चेनंतर धर्मेंद्रला हेमा मालिनीशी बोलण्याची परवानगी मिळाली आणि त्यानंतर थोड्याच वेळात हेमाने जीतेंद्रशी लग्न करण्यास नकार दिला. हेमा मालिनीच्या या बदललेल्या निर्णयामुळे अभिनेता जितेंद्रही खूप नाराज झाला होता.

जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला. जितेंद्रचे खरे नाव ‘रवि कपूर’ आहे. जितेंद्र 1960 ते 1990 दरम्यान एक सक्रिय अभिनेता होता. तो त्या काळातील सर्वोत्कृष्ट डान्सर मानला जात असे. 1959 मध्ये त्यांनी दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटात दुहेरी भूमिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

जितेंद्र आणि हेमा मालिनीच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा हेमा मालिनी यांनी नेमकेच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती त्या काळात जितेंद्र सुपरस्टार मानला जात असे. त्या काळात प्रत्येक अभिनेत्री त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक होती. त्यावेळी हेमा मालिनी यांनी जितेंद्रला जास्त भाव दिला नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.