chahool-features-a-russian-girl-in-the-lead-role

Chahool Features a Russian Girl In The Lead Role

कलर्स मराठीवरील चाहूलमध्ये फॉरेनची पाटलीणबाई लीझान
मराठी मालिकेत पहिल्यांदाच परदेशी युवती होणार नायिका

Colors Marathi कलर्स मराठीने आजवर अनेक नव नवीन प्रयोग केले आहेत मग
कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये असो वा मालिकांद्वारे असो प्रेक्षकांना ते नेहेमीच आवडले आहेत. कलर्स
मराठीवरील मालिका कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आल्या आहेत आणि आता कलर्स मराठी
लवकरच घेऊन येत आहे एक नवीकोरी मालिका Chahool  ‘चाहूल’ ! पहिल्यांदाच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना
अश्या प्रकारची मालिका बघायला मिळणारा आहे.

मालिकेच्या नावावरूनच मालिकेमध्ये काही
विशेष बघायला मिळणार आहे ह्याचा अंदाज येतो. Chahool ‘चाहूल’ या मालिकेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य
म्हणजे लीझान ही परदेशी युवती या मालिकेत जेनिफरची व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका परदेशी
युवतीने नायिकेची भूमिका करणं, हे मराठी दैनंदिन मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत
आहे.

leesan-in-chahool-tv-serial

Leesan लीझान हि चाहूल मध्ये एका मुख्य भूमिकेत असून ती मुळची रशियाची रहिवासी आहे.
मालिकेमध्ये ती सुरुवातीला इंग्लीशमध्ये बोलणार असून मराठीमध्ये हळूहळू ती नक्कीच बोलेले
अस म्हणायला हरकत नाही. सेटवर इतरांना मराठीमध्ये बोलताना बघून लीझानला मराठी भाषेचे
कुतूहल वाटते म्हणून जेनिफर म्हणजेच लीझान मराठी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते हे विशेष.
यामुळे सेटवर हसते खेळते वातावरण रहाते. लीझानचा चाहूल मधील हा हटके लुक नक्कीच
आवडेल अस वाटत आहे.

russian-girl-in-leesan

तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल लवकरच कलर्स मराठीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here