ढोलकीच्या तालावर – छोट्यांची अदाकारीलै भारी १ मे पासून कलर्स मराठीवर !

लहान मुलींची निरागस अदाकारी संपूर्ण महाराष्ट्राला लावणार वेड

कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने विविध कलांचा समृध्द वारसा जोपसणाऱ्या महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्यशैलीला प्रेक्षकांसमोर अनेक वर्षे यशस्वीरीत्या सादर केले आहे. तसेच ज्या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये प्रेक्षकांना नेहेमीच लावणी ही नृत्यशैली नाविन्यपूर्ण ढंगात बघायला मिळाली तो कार्यक्रम म्हणजे ‘ढोलकीच्या तालावर’ Dholkichya Talavar . महाराष्ट्रदिनानिमित्त ‘ढोलकीच्या तालावर’ Dholkichya Talavar घेऊन येत आहे या कार्यक्रमाचे तिसरे पर्व एका नव्या ढंगात. या संपूर्ण पर्वामध्ये लावणी जोडीने सादर होणार आहे छोट्या अप्सरांना मोठ्या लावण्यवतींची साथ मिळणार आहे. हे पर्व लावणीची परंपरा आणि प्रयोगशीलता यांचा संगम असणार आहे. या पर्वाचे परीक्षक असणार आहेत, जेष्ठ नृत्यांगना शकुंतलाताई नगरकर, अष्टपैलू अभिनेता जिंतेंद्र जोशी आणि उत्तम नर्तिका आणि मराठीतील सगळ्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका ‘ढोलकीच्या तालावर छोट्यांची अदाकारी… लै भारी’ १ मेपासून सोम आणि मंगळ रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर.

‘ढोलकीच्या तालावर’ Dholkichya Talavar कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असंख्य लहान मुलींनी हजेरी लावली, ज्यामधून काही निवडक मुलींनाच या पर्वामध्ये आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या छोट्या मुलींची निरागस अदाकारी, नृत्याबद्दलची जाण आणि प्रेम बघून परीक्षक थक्क झाले आणि आता या लहान मुली येत आहेत अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अदाकारीने आपलसं करण्यासाठी. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि अश्या अनेक ठिकाणी जाऊन १२ प्रतिभावान आणि नृत्याची जाण असणाऱ्या स्पर्धकांना निवडले आहे जे तुम्हाला या कार्यक्रमामध्ये बघायला मिळणार आहे. प्रचीती कुलकर्णी, अनुष्का देशपांडे, समृद्धी शेडगे आणि अश्या लहान लहान मुलींचे नृत्यकौशल्य ढोलकीच्या तालावरच्या नव्या पर्वामध्ये बघायला मिळणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त बोलताना परीक्षकांनी देखील आपली मते मांडली. जिंतेंद्र जोशी म्हणाला, ‘लावणी हा प्रकार यावेळेस छोट्या मुलीं सादर करणार आहेत त्यामुळे हा अनुभव नक्कीच खास असणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे कि प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. तसेच, फुलवा खामकर म्हणाली, “माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कारण ढोलकीच्या तालावरद्वारे पहिल्यांदाच एका कार्यक्रमामध्ये लहान मुलींना लावणी करताना बघायला मिळणार आहे. लावणी आणि लहान मुली हे समीकरण वेगळ आहे. कारण, मी बऱ्याचदा बघितल आहे, मुली लावणी करताना वेगवेगळे अंगविक्षेप आणि हावभाव करतात जे खरतर गरजेच नसत लावणी हे सगळ न करता देखील सुंदररीत्या सादर होऊ शकते आणि हेच माझ्या स्पर्धकांना आणि महाराष्ट्रातील सगळ्या लहान – मोठ्या मुलींना शिकविण्याची सुवर्णसंधी मला या कार्यक्रमाद्वारे मिळाली आहे असं मला वाटत. तसेच जेष्ठ नृत्यांगना शकुताई नगरकर म्हणाल्या, “मला खूप आनंद होतो आहे या कार्यक्रमानिमित्त लहान मुली लावणी या नृत्यशैलीकडे वळल्या आहेत. नाहीतर आजकल मुलींचा कल इतर नृत्यप्रकारांकडे जास्त असतो. मला या लहान मुलींचा कौतुक करावसं

वाटत कि, यानिमित्ताने तरी लोकांना कळेल लावणी काय आहे, आणि या लहान मुलीचं लावणीला पुढे घेऊन जातील तसेच प्रतिष्ठा मिळवून हे नक्की”.

 या मंचावर महाराष्ट्राच्या लोककलेच्या उज्जवल परंपरेचा अभिजात ठेवा पुढच्या पिढीसोबत सादर होणार आहे. या छोट्यांच्या निरागस अदाकारीला उस्फुर्त दाद देण्यासाठी पहायला विसरू नका ‘ढोलकीच्या तालावर’ Dholkichya Talavar छोट्यांची अदाकारी… लै भारी’ १ मे पासून सोम आणि मंगळ रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर.