कलर्स मराठीवरील महा रविवारच्या विशेष भागामध्ये मैत्री आणि प्रेमाच्या रंगांची उधळण होणार आहे. घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताचे नाते नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. जिथे कियाराच्या खोट्या वागण्याने तिने अक्षयचा विश्वास पूर्णपणे गमवला आहे आणि यामधून बाहेर येण्यासाठी अक्षय अमृतामध्ये कुठेतरी दुरावलेली मैत्री शोधू लागला आहे… पण, अमृताला अक्षयच्या मनाची घालमेल कळते आहे, अक्षयच्या वागण्यामागचे कारण मात्र होळीच्या दिवशी अमृताला कळले आहे.

आता ती हे सत्य घरच्यांना आणि अक्षयला कसे सांगेल ? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आहे. याचबरोबर सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु सिद्धार्थच्या घरी येऊन गेली आहे… नेहा आणि सिद्धार्थच्या बोलण्यातून त्याला असे समजते कि अनुला रंग खेळायला खूप आवडायचे पंरतु अवीच्या अचानक जाण्याने अनु आता रंगपंचमी साजरी करत नाही… महा रविवारच्या रंगपंचमी विशेष भाग रंगणार असून अनुच्या आयुष्यात सिद्धार्थ पुन्हा प्रेमाचा रंग आणू शकेल ? अक्षय – अमृता रंगपंचमी कशी साजरी करतील ? हे बघणे रंजक असणार आहे. याच बरोबर महाराष्ट्र जागते रहो या कार्यक्रमाचा देखील विशेष भाग महा रविवार मध्ये बघायला मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा या तिन्ही कार्यक्रमांचे विशेष भाग येत्या रविवारी म्हणजे २४ मार्च दु. १२ आणि संध्या. ७ वा. भाग नक्की बघा कलर्स मराठीवर.

घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय अमृतासोबत रंगपंचमी खेळताना दिसणार आहे… तर दुसरीकडे कियाराचे म्हणणे आहे कि, मी अक्षयच्या हातूनच रंग लावणार… पण हे होत असतानाच माई या सगळ्यावर काय म्हणतील ? अमृता कसे माईना तिची बाजू समजवून सांगेल ? अक्षयचे यावर काय म्हणणे असणार आहे… अनुच्या घरी सिद्धार्थ खास रंगपंचमी साजरी करण्यासाठी येणार आहे. तर दुसरीकडे दुर्गा सिद्धार्थच्या आयुष्यातुन अनुला दूर करण्यासाठी नवा डाव रचणार आहे.

दुर्गा या सणाचा बेरंग करू शकेल ? कियाराचे सत्य अमृता रंगपंचमीच्या दिवशी अक्षय आणि घरच्यांना सांगू शकेल ? याचबरोबर महाराष्ट्र जागते रहो या कार्यक्रमामध्ये मन सुन्न करणारी अमानवीय, माणुसकीला लाजवणारी कुठली भयानक घटना बघायला मिळेल आणि त्या गुन्हेगाऱ्यापर्यंत पोलीस कसे पोहचले ? हे जाणून घेण्यासठी बघा महाराष्ट्र जागते रहो कार्यक्रमाचा रविवारचा विशेष भाग, तसेच घाडगे & सून आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांचे भाग रविवारी म्हणजे २४ मार्च भाग नक्की बघा दु. १२ वा. आणि संध्या. ७ वा. कलर्स मराठीवर