प्रेम ही एक अशी संकल्पना आहे जी लोक मरे पर्यंत अनुभवत असतात. त्याला कोणतेही बंधन नसते. कोणत्याचं मर्यादा नसतात. ते वाऱ्यासारखे आणि पाण्याप्रमाणे संथ वाहत असते. अशाचं भावनांना उजाळा देणारं झी म्युझिक प्रस्तुत आणि एम. सुधाकर निर्मित मराठी व्हिडीयो ‘क्षितिजा परी’ नुकताचं मराठीतील आघाडीचे अभिनेते अनिकेत विश्वासराव यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

‘ क्षितिजा परी ‘ म्युझिक व्हिडीयो दुर्गेश पाटील या उमद्या गायकाच्या आवाजात स्वरबद्ध केला असून, त्याच्यावरचं हे गाणं चित्रित करण्यात आलयं. महेश मटकर यांच्या संगीताने सजलेल्या ह्या व्हिडियोचे कॅमेरामॅन सोनी सिंग आहेत. तसेच दुर्गेशला व्हिडीयो मध्ये साथ देणारी देखणी अभिनेत्री म्हणजेच पूजा ठाकूर ही आहे.

दक्षिण भारतातील महान असे काॅरिओग्राफर म्हणून ओळखले जाणारे एम. सुधाकर ह्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कोरिओग्राफ केले आहे. मराठी सृष्टीत त्यांनी ‘क्षितिजा परी’ ह्या व्हिडियो गाण्यातून प्रथमचं पदार्पण केले आहे. ‘क्षितिजा परी’ हे गाणं प्रेम आणि त्याचं नातं ह्यावर आधारित असून निखळ प्रेमकथा दर्शवून देते. असे ह्या गाण्याचे निर्माते एम.सुधाकर कॅफेमराठीशी बोलताना सांगत होते.

दुर्गेश पाटील हा जरी नवीन कलाकार असला तरी त्याची समजून घेण्याची क्षमता आणि करण्याची जिद्दही खूपचं पावरफूल आहे. त्यामूळे त्याला कोरिओग्राफ करणं कठीणं गेलं नाही, असं एम. सुधाकर म्हणाले. मराठी संस्कृती , तिथली माणसं, त्यांची आपूलकी, भावना ह्या त्यांना खूप आवडतात आणि इतके वर्ष मुंबई मध्ये राहिल्यानंतर हे सर्व त्यांना आपलंस वाटू लागलंय त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

रोमांस आणि त्यासाठी उत्तम असं लोकेशन म्हणजे मनाली. तिथल्या पहाडी भागातील संस्कृती ह्या गाण्यातून पहायला मिळेल. पहाडी भाग, हिरवळ हे सर्व अगदी गाण्याला सुंदर करण्यासाठी खूप होतं म्हणून मनाली मध्ये ह्या संपूर्ण गाण्याची शूटिंग केल्याचे एम. सुधाकर म्हणतं होते. ह्या म्युझिक व्हिडियो द्वारे मराठी सृष्टीत पदार्पण केल्यानंतर आता मराठी चित्रपट निर्मिती देखील करणारं असल्याचे त्यांनी सांगितले आणि ह्या म्युझिक व्हिडियो सारखाचं चांगला प्रतिसाद माझ्या चित्रपटाला मिळेल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.